adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकांनी अट्टल चोराला पकडुन दिले पोलिसांचा ताब्यात

  चोपडा उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकांनी अट्टल चोराला पकडुन दिले पोलिसांचा ताब्यात काल्पनिक फाईल चित्र  चोपडा,दि.३(प्रतिनिधी) (संपादक -...

 चोपडा उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकांनी अट्टल चोराला पकडुन दिले पोलिसांचा ताब्यात

काल्पनिक फाईल चित्र 

चोपडा,दि.३(प्रतिनिधी)

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

उपजिल्हा रुग्णालयात मागील काही दिवसांपासून चोरीचे सत्र सुरूच होते त्या अनुषंगाने दि.१/२/२०२५ रोजी रात्री अकरा वाजेचा सुमारास उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर रॅम्प सुरक्षा रक्षक गस्त घालत असताना त्यांना चोरीचा उद्देशाने फिरत असलेला संशयित आढळून आला त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याने दगड फेकून मारला तो दगड सुरक्षा रक्षक दीपक बडगुजर यांचा लागला त्यात त्यांचा डोळा थोडक्यात वाचला व चोर पळला त्या वेळी वार्ड बॉय गोपाल खैरनार व सुरक्षा रक्षक दीपक बडगुजर यांनी दुचाकी वर त्याचा पाठलाग करत एक किलोमीटर अंतरावर पकडले सदर व्यक्ती हा प्रशांत वाडे गोरगावले येथील रहिवासी असल्याचे सांगितले चोराला पकडल्या नंतर डॉ प्रसाद पाटील यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशनला कळवले व चोराला पोलिसांचा ताब्यात दिले प्रशांत वाडे हा अट्टल गुन्हेगार आहे त्यावर चोपडा शहर पोलिस ठाण्यात घरफोडी व चोरीचे पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती चोपडा पोलिस निरीक्षक मधुकर सावळे यांनी दिली

No comments