मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात ग्रंथदिंडी चे आयोजन संपन्न... जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मराठी भाषा...
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात ग्रंथदिंडी चे आयोजन संपन्न...
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नूतन मराठा महाविद्यालय मराठी विभाग यांच्या आयोजनातून ग्रंथदिंडी काढण्यात आली..
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्राचार्य साहेबांच्याच हस्ते पालखीचा शुभारंभ करण्यात आला..
पालखीची मिरवणूक महाविलयापासून प्रारंभ झाली तर ज्ञानेश्वर मंदिरात समारोप करण्यात आला.. दरम्यान ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांच्या हातात मराठीतील मान्यवर कविंच्या कवितांच्या ओळी आणि घोषवाक्यांचे फलक देण्यात आले होते तसेच ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या गजरात आणि माय मराठी चिरायू होवो या घोषणांनी अवघा परिसर दणाणून गेला होता..
पालखीत लिळाचरित्र, विवेकसिंधू,ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, संत नामदेवांची अभंगवाणी, संत एकनाथ महाराज यांच्या भारुड गाथा, वच्छहरण, ययाती, विशाखा,अष्टदर्शने, नटसम्राट, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, ताम्रपट अशा मराठीतील श्रेष्ठ ग्रंथ ठेवण्यात आले होते..
याप्रसंगी प्राचार्य डॉ एल पी देशमुख, उपप्राचार्य डॉ के बी पाटील, उपप्राचार्या एम एस पाटील, मराठी विभाग प्रमुख प्रा ललिता हिंगोणेकर, प्रा डी आर चव्हाण,प्रा.एन जे पाटील, प्रा इंदिरा पाटील, प्रा.डाॅ राहुल संदानशिव,प्रा भागवत पाटील,प्रा भाऊसाहेब पडलवार, प्रा.आफाक शेख,प्रा आर बी देशमुख,प्रा घनश्याम पाटील, प्रा राकेश गोरसे, प्रा रत्नाकर कोळी, प्रा बाळासाहेब सुर्यवंशी, प्रा निखिल सपकाळे, प्रा.विशाल पाटील, प्रा डॉ मंगला तायडे,प्रा तेजल पाटील,प्रा वंदना पाटील,प्रा.कार्तिक देसाई यांच्यासह सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते..
No comments