adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चौगाव किल्ला विकास निधी बाबत आमदार आन्नासाहेबांची पर्यटन मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा.

  चौगाव किल्ला विकास निधी बाबत आमदार आन्नासाहेबांची पर्यटन मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा. विश्राम तेले चौगाव.ता.चोपडा प्रतिनिधी  (संपादक-:- हे...

 चौगाव किल्ला विकास निधी बाबत आमदार आन्नासाहेबांची पर्यटन मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा.


विश्राम तेले चौगाव.ता.चोपडा प्रतिनिधी 

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

 चोपडा तालुक्यातील चौगाव किल्ला हा बाराव्या शतकातील अहिर राजांच्या काळात बांधला गेला.सत्तावीस एकर मधील समुद्र सपाटी पासून दोन हजार फुट व जमीनी पासून चारशे फुट उंच असलेला हा किल्ला भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला.जळगाव जिल्ह्यातील सुस्थितीत असणारा हा एकमेव डोंगरी किल्ला आहे.दोन प्रवेशद्वार,सप्ततलावांचा समुह,पाण्याच्या टाक्या (लेण्या), अनेक भुयारी मार्ग,पंचवीस फुट उंच भींती असलेला मोठा गवळी वाडा, तटबंदी,आई भवानीचे पडलेले मंदिर असे अनेक अवशेष आहेत.बाजूला असलेला जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा तीन नाल्यांचा समुह व स.न.१९२६ साली स्वामी शांतानंद गौरी शंकर रामटेक वाले यांनी जिर्णोद्धार केलेले भगवान शंकर यांचे मंदिर व पंचमुखी हनुमान,नंदी व गणपती यांच्या मुर्त्या आहेत.

पण हा किल्ला महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेलगत जंगलात अतिदुर्गम भागात असल्याने दुर्लक्षित राहिला.पण मागील काही महिण्यांपुर्वी चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आन्नासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून दहा कोटींचा निधी मंजूर झाला होता.पण विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागल्यामुळे  हा विषय प्रलंबित राहिला होता.पण आता पाच तारखेला आमदार आन्नासाहेब चंद्रकांत सोनवणे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री श्री शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन चौगाव किल्ला विकासाठी भरीव नीधीची मिळाला याबाबत सकारात्मक चर्चा केली असून.मंत्रीमहोदयांनी या बाबत सकारात्मकता दर्शविली आहे.

No comments