मायक्रो फायनान्स अजब गजब है सध्या राज्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आपली पकड घट्ट केली आहे परंतु हि पकड इतकी घट्ट होत चालली आहे की या म...
मायक्रो फायनान्स अजब गजब है
सध्या राज्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आपली पकड घट्ट केली आहे परंतु हि पकड इतकी घट्ट होत चालली आहे की या मगर मिठीतुन सर्व सामान्य माणसाला सहजासहजी सुटणं फार जिकिरीचे होणार आहे कुणी ही पै पाहुणे आले कि आपण सहज म्हणतो थांबा एक दोन दिवस पण ते लगेच म्हणतात नको नको उद्या आमचा हप्ता आहे हा हप्ता काही कष्टाळू सर्व सामान्य माणसाला रात्रीची शांत झोप होवू देत नसेल हे इतकं मात्र खर आज खुप दिवसांनी लिहिण्याचा योग आला तो असा कि आपल्या चोपडा शहरातिल मि एका नामांकित अशा मायक्रो फायनान्स कंपनीच्या ऑफिस मध्ये माझ्याच कामानिमित्ताने गेलो होतो आमच्या गटातील काही महिलांनी व आमच्या सौ. यांनी एका प्रतिष्ठित अशा मायक्रो फायनान्स कंपनीच्या माध्यमातून कर्ज घेतले होते, आहे या कंपनीत कामाला असणाऱ्या एका महाभागाने परस्पर कर्जदार महिलांच्या नावावर कर्ज काढून घेतले याची आम्हाला थोडी ही माहिती नव्हती पण या महाभागाने नोकरी सोडली कि बदली झाली ते माहित नाही मग या कंपनीने माझे कडे शिल्लक कर्जाची रक्कम वसूली करीता येणे बंद केल्याने मला जरा शंका निर्माण झाली मि फोन करून त्यांना हप्ता घेऊन जा यासाठी सांगु लागलो तर ते फक्त हो म्हणून वेळ मारून नेत होते मला शंका निर्माण झाल्याने मि एका/ दुसऱ्या ठिकाणी कर्ज मागणी केली तर तेथे माझे कर्ज रिजेक्ट झाले मि शंका काढण्यासाठी या कंपनीचे ऑफिस गाठले तर मला माहित व्यवस्थित रित्या आधी दिली गेली नाही मला लोन आय डी सांगितले जात नव्हते वरुन मला या महाभागांनी थकबाकीदार ठरवले असो. यात महत्त्वाचा विषय असा कि संबंधित महिलांचे सही अंगठा शिवाय कसे काय कर्ज काढले असेल तर त्या विषयी कंपनीला ही काही सांगता आले नाही परंतु महत्त्वा मुद्दा असा कि इतके सारे चालतेच कसे हे सोडा त्यानं कर्जे काढून घेतले पण दूसरा व्यक्ती हप्त्याची रक्कम गोळा करायला यायचा तो ही हप्ता वसुली करुन कंपनीच्या ऑफिसात भरणा करत नाही मग किती विशेष खर पहाता येथे एक बि.एम.हे पद असुन यात बि.एम.हा सहभागी नसेल हे कशावरून इकडे आपण हप्ता रेग्युलर करतो कारण आपल्याला अडचण नको परंतु या ऑफिस वाल्यांकडुन वसुली होवून ही हप्ता ऑफिसला जमा होत नाही हे चित्र मि स्वतः अनुभवले असो तरी या पापाचे भागीदार कोण ? आजचा विषय डोळ्यात अंजन घालणारा आहे या सर्व बाबींवर लगाम घालणार कोण मायक्रो फायनान्स कंपनीच्या ऑफिसला आपण चौकशी करायला गेलो तर ते व्यवस्थित आपल्याशी बोलत ही नाहीत जसे काही आपण चोर च आहोत अशी वागणूक देतात आपण आपली ओळख दिली तर ते आपल्याकडे मारक्या बैलासारखे पहात तोंड वाकडं करतात इतकी मुजोरी मी कोणत्याही ऑफिसात पाहिली नाही पण महत्त्वाचा विषय तो हा कि हे परस्पर कर्जदाराला न सांगता कर्ज काढतात कसं बर काढल तर काढल परंतु कर्जदार महिलांना ऑफिसला बोलावून त्यांना उलटसुलट सांगुन त्यांचे लेखी ऑफिसवालेच हुशारी ने निवेदनद्वारे कर्जदारालाच ऑफिसातच लेखी द्यायला लावतात म्हणजे कंपनीतले कर्मकांड बाहेर येवू नये साठी ते कर्जदारालाच बळीचा बकरा बनवितात वरून दम देतात किती अंधेर नगरी चौपट राजा असा खेळ चावलविला जात आहे हप्ता वसुली करुन जमा होत नाही ति रक्कम कर्जदाराच्या खात्यावर तशीच असते इकडं आपण समजतो भरला हप्ता पण आज वास्तू स्थिती तशी नाही मि पुराव्यानिशी बोलतोय लिहितोय किती घोळ हा जर माझ्या सारख्या माणसाला हे असे खेळवत असतील तर सर्व सामान्य माणसाला तर हे काय करीत असतिल हे समजणे ही मुश्किल वाटते. मि गेल्या काही महिन्यांपासून ह्या ऑफिसला फेऱ्या ही मारल्या पण यांची बातच जरा अजब आहे मला माहिती घेताना थोडा का होईना पण त्रास झालाच. पण यातुन सांगाव ते असे कि कुठलीही मायक्रो फायनान्स कंपनी असो बाबांनो तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे जर हप्ता म्हणून भरत असणार तर मात्र ऑफिसला जावुन खात्री करा एवढंच सांगेन सध्या काही मायक्रो फायनान्स कंपनीच्या कडून लूट चालू आहे कि काय असेंच वाटायला लागलं जर का कंपनी बि.एम.हे पद त्या शाखेत महत्त्वाचे आहे तर हे बि.एम महाशय इतक सार चालत असेल या शाखेत करतात काय जर मि माझ्या या अकांऊट ची चौकशी केली नसती तर मला हा सारा खेळ समजलाच नसता आता तरी मायक्रो फायनान्स कंपनीच्यां मार्फत कर्ज घेणाऱ्या कर्जदार महिलांनी कंपनीच्या ऑफिसात जावून खात्री करुन घ्यायला पाहिजे नाहीतर तुम्ही हप्ते भरत राहणार व तुम्हाला हे कर्ज भरत भरत खुप त्रास होईल एवढे मात्र खरे असो परंतु मि यासाठी एक निर्णय लवकरच घेत असून या सर्व गोष्टीवर लगाम घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक यांचेकडे मला तक्रार दाखल करावी आता असेच वाटायला लागले आहे
![]() |
| शामसुंदर सोनवणे नेशन महाराष्ट्र व्यवस्थापकीय संपादक मो.८२०८४४९९८३ |

No comments