सांगवी बुद्रुक येथे आरंभ पालक मेळावा उत्साहात इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथून जवळच असलेल्या सांगवी बुद्रुक येथ...
सांगवी बुद्रुक येथे आरंभ पालक मेळावा उत्साहात
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथून जवळच असलेल्या सांगवी बुद्रुक येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांगवी चे उपसरपंच अतुल फिरके होते. प्रमुख पाहुणे म्हणून योगेश भंगाळे, अशोक भंगाळे, युवराज भंगाळे तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. अर्चना आटोळे व पर्यवेक्षिका श्रीमती कल्पना तायडे, सौ शोभा पाटील व सौ. जया नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
सुरुवातीला पोषण आहाराबद्दलची प्रतिज्ञा सलीमा तडवी यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून म्हणून घेतली. या आरंभ पालक मेळाव्यामध्ये लहान मुलांच्या बौद्धिक व शारीरिक विकासासोबतच योग्य आहार कसा असावा आणि गर्भधारणा काळातील काळजी, अंगणवाडीमध्ये बालकांची संख्या वाढावी यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे महत्त्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अधोरेखित करावे असे प्रतिपादन पर्यवेक्षिका श्रीमती कल्पना तायडे यांनी केले. त्याचप्रमाणे मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढी बाबत महत्त्वाचे मुद्दे उदाहरणासहित उपस्थितांना सौ. शोभा पाटील यांनी पटवून दिले. या कार्यक्रमाला न्हावी, सांगवी बुद्रुक, चितोडा, बोरखेडा बुद्रुक, पिंपरुड येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासाबद्दल पालकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून अंगणवाडी सेविकांनी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सलीमा तडवी यांनी केले.


No comments