adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विष्णापुर शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी जाणून घेतल्या समस्या व विद्यार्थ्यांसोबत केले भोजन.

  विष्णापुर शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी जाणून घेतल्या समस्या व विद्यार्थ्यांसोबत केले भोजन. चोपडा प्...

 विष्णापुर शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी जाणून घेतल्या समस्या व विद्यार्थ्यांसोबत केले भोजन.


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा.ना.अशोक उईके यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील आदिवासी आश्रम शाळेत आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी,यांनी आश्रम शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी "संवाद चिमुकल्यांशी" अभियान राबविण्यात आला,यानुसार चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा तालुक्यातील विष्णापूर शासकीय आश्रम शाळा येथे भेट देऊन येथील विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नियमित देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा,भोजन व्यवस्था,निवास व्यवस्था,पिण्याचे पाणी,शौचालय,स्नानगृहाची स्वच्छता,शालेय इमारत व वस्तीग्रह स्वच्छता, विद्यार्थ्यांना आंघोळीला गरम पाणी देण्यात येते किंवा नाही कशा प्रकारे पाणी दिले जाते अशा बारीक सारीक गोष्ट याची सखोल तपासणी करून कर्मचाऱ्यांना त्रुटीबद्दल सुधारण्यासंदर्भात सूचना केल्या एवढेच नाही तर आदिवासी आश्रम शाळेचे विद्यार्थ्यांसोबत भोजन करून थंडगार हवेत शेकोटी पेटवून शेकोटीच्या बाजूला बसून "चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद" केला विद्यार्थ्यांना काही अडचणी आहेत का ? शिक्षक व्यवस्थित शिकवत आहेत का? भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे? या संदर्भात देखील त्यांच्याशी चर्चा केली,मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांची गप्पा रंगल्याने विद्यार्थ्यांना देखील झोपण्याचा विसर पडला का काय असं वाटत होतं .


यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी व यावल येथील प्रकल्प अधिकारी व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक यांना आश्रम शाळेबद्दल असणाऱ्या समस्या व त्या कशा सुधारता येतील या संदर्भात आदिवासी विकास मंत्री यांना अहवाल सादर करणार असल्याचे देखील यावेळी आमदारांनी सांगितले.नरेंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,संचालक कृषी उत्पन्न बाजार पंचायत समिती रावसाहेब पाटील,सूर्यभान पाटील,विजय पाटील,गोपाल पाटील,शिवराज पाटील,किरण देवराज व प्रताप अण्णा पाटील उपसरपंच आडगाव,यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार,सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील,गणेश पाटील सरपंच मालखेडा,गजानन कोळी उपसरपंच वडती,संजय सोनवणे माजी सरपंच विष्णपूर,तर रवींद्र पाटील,सतिलाल धनगर,मंगल इंगळे,उदयभान इंगळे,रावसाहेब पाटील,अमोल शेटे,किरण निंनायदे,अरुण लांडगे,दीपक महाजन हे शिवसैनिक उपस्थित होते व या सगळ्यांच्या सत्कार करण्यात आला तसेच विष्णापुर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक,कर्मचारी व विष्णपूर गावातील नागरिक व शिवसैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

No comments