adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एरंडोल येथील आशा पाटील 'महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित.

  एरंडोल येथील आशा पाटील   'महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित. जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील  (संपादक हेमकांत गायकवाड) -...

 एरंडोल येथील आशा पाटील   'महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित.


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक हेमकांत गायकवाड)

- एरंडोल येथील आशा ब्युटी क्लिनिकच्या संचालिका आशा पाटील यांना सौंदर्य व त्वचेची काळजी या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल मानाचा 'महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार' प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.समाचार वाणी व रिसेल डॉट इन यांच्यातर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार नाशिक येथील रेडिसन ब्लू हॉटेल येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी मुख्य अतिथी प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित उपस्थित होत्या तसेच भारतीय संरक्षण क्षेत्रातील आयुध निर्माण फॅक्टरी चे जनरल मॅनेजर संजय हजारी, भारतीय सूक्ष्म व मध्यम लघुउद्योगचे डायरेक्टर अभय दप्तरदार , युको बँकचे जनरल मॅनेजर अमलेश त्रिपाठी उपस्थित होते.

   सदर पुरस्कार हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, हेल्थकेअर आणि सौंदर्य , स्टार्ट अप, बांधकाम क्षेत्र इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल देण्यात येतो. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात ब्युटी पार्लर या कॅटेगिरी अंतर्गत एरंडोल येथील आशाताई पाटील यांची निवड झाल्याबद्दल एरंडोल नगरवासी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments