जिल्ह्यातून हद्दपार केले असताना ते दोघे फिरत होते ब्रह्म तळ्यावर सापळा रचून भिंगार कॅम्प पोलिसांनी त्या दोघांना घेतले ताब्यात अहिल्यानग...
जिल्ह्यातून हद्दपार केले असताना ते दोघे फिरत होते ब्रह्म तळ्यावर
सापळा रचून भिंगार कॅम्प पोलिसांनी त्या दोघांना घेतले ताब्यात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील पाहिजे असलेले फरार आरोपी हद्दपार असताना भिंगार येथील अंतिम चौक ब्रह्मतळे या ठिकाणी आढळल्याने कॅम्प पोलिसांनी दोघांना तात्काळ अटक करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहे.अन्या उर्फ आनंद राजेंद्र नायकू रा. भिंगार, आकाश संजय पवार रा.नागरदेवळे,या दोन आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,पोहेकॉ/दीपक शिंदे,संदीप घोडके,रवी टकले, प्रमोद लहारे,अमोल आव्हाड यांनी केली आहे.
No comments