दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे :- प्रांताधिकारी बबन काकडे रावेर/फैजपूर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत ग...
दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे :- प्रांताधिकारी बबन काकडे
रावेर/फैजपूर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर नगरपालिकेच्या ५ टक्के दिव्यांग निधी दरवर्षीप्रमाणे दिव्यांग बांधवांना पालिकेतील राखीव निधी निधीतून पाच टक्के दिव्यांग निधी सन २४-२५ चे लाभार्थ्यांना नगरपालिका प्रशासक तथा फैजपूर उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांच्या हस्ते २५०, दिव्यांग बांधवांना ६ लाख ८६ हजार रक्कम धनादेशाद्वारे उपविभागीय कार्यालयात वाटप करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी दिव्यांग बांधवांच्या असलेल्या सर्व समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्या सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे फैजपुर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी सांगितले. निधी वितरित करताना नगर परिषदेचे संगीता बाक्षे, कार्यालयीन अधीक्षक प्रवीण सपकाळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी हेमंत ठाकरे करनिरीक्षक विद्या सरोदे समुदाय संघटक तसेच दिव्यांग बांधवांचे शहर संघटनेचे नितीन महाजन, चेतन तळेले, नाना मोची व इतर प्रतिनिधी उपस्थित होते. ग्रामीण भागामध्ये घरपट्टी दिव्यांगांना माफ करण्यात आलेली आहे. शहरी भागामध्ये घरपट्टीत सूट देण्यात यावी, अशी मागणी दिव्यांग बांधवांची आहे.
No comments