adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ .झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक . विद्यालयात घाणीचे साम्राज्य साफसफाईकडे ही संस्था चालकांचे दुर्लक्ष

 डॉ .झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात घाणीचे साम्राज्य साफसफाईकडे ही दुर्लक्ष   यावल, (प्रतिनिधी)  (संपादक -:- हेमकांत ग...

 डॉ .झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात घाणीचे साम्राज्य साफसफाईकडे ही दुर्लक्ष


 यावल, (प्रतिनिधी) 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येथील डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात घाणीचे साम्राज्य झालेले आहे. याकडे संस्थाचालक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. यावल शहरात या विद्यालयात सर्वात जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. वाढीव विद्यार्थी संख्या असल्याने विद्यालयाच्या आवारात सुविधा असणे गरजेचे आहे. मात्र, सर्व सुविधांचा अभाव येथे व परिसरात दिसून येत आहे.



मुतारी स्वच्छ नाही, शौचालय तसेच घाणीचे उकिरडे पडलेले दिसून येत आहेत. हे साफसफाई करणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यास याप्रकारामुळे धोका निर्माण होऊ शकतो. आरोग्य विभागाने अशा या प्रकाराकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे. संस्थाचालकांनी डोळे झाक न करता कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असे विद्यार्थी पालक वर्गातून बोलले जात आहे


No comments