adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खासदार नीलेश लंके संसदे बाहेर करणार आंदोलन

  खासदार नीलेश लंके  संसदे बाहेर करणार आंदोलन  अहिल्यानगर (प्रतिनिधी):- (संपादक -:-हेमकांत गायकवाड)   सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्यांची ...

 खासदार नीलेश लंके  संसदे बाहेर करणार आंदोलन 


अहिल्यानगर (प्रतिनिधी):-

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी ही आमची मागणी असून त्यासंदर्भात आपण संबंधित मंत्र्यांची भेट घेउन निवेदन सादर करणार आहोत. मागणीची दखल न घेतली गेल्यास सोमवारी संसदे बाहेर या प्रश्नावर आंदोलन करू असा इशारा खा.नीलेश लंके यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला.संसदेच्या अधिवेशनामध्ये नवी दिल्लीमध्ये असलेल्या खा. नीलेश लंके यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.या भेटीनंतर पवार यांच्या निवसासस्थानाबाहेर खा.लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  खा.लंके म्हणाले,सोयाबीन खरेदीसाठी शासनाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली नाही.त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ भेटलीच पाहिजे.यासंदर्भात संबंधित मंत्री महोदयांशी आपण पत्रव्यवहार करणार आहोत. आजही सोयाबीन खरेदी केंद्रांवर शेतकरी विविध वाहनांमधून सोयाबिन घेउन आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.आठ दिवसांची मुदत वाढ देऊन काही होत नाही.किमान एक महिन्याची मुदत वाढ द्यायला हवी. शेतकऱ्यांना द्यायचे असेल तर मोकळया मनाने दिले पाहिजे. आठ दिवस मुदतवाढ दिल्यानंतर त्याची माहीती होण्यासाठी दोन दिवस जातात.मग चार पाच दिवसांत काय होणार आहे ? असा सवाल खा.लंके यांनी केला.नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना खा. नीलेश लंके यांनी विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

No comments