मनवेल येथे जलजीवन मिशनचे काम कासवगतीने पाण्याच्या टाकीचे काम पुर्ण होणार कधी भरत कोळी, ता यावल प्रतिनिधी -:- (संपादक-:- हेमकांत गायकवाड) ग...
मनवेल येथे जलजीवन मिशनचे काम कासवगतीने पाण्याच्या टाकीचे काम पुर्ण होणार कधी
भरत कोळी, ता यावल प्रतिनिधी -:-
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
ग्रामीण भागात दरडोई किमान ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचा संकल्प करीत केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजना आणली. मात्र योजनेची कामे सुरू असलेले २०२४ हे वर्ष संपले असुनही जल जीवन मिशन योजना अर्तगत सुरू असलेले कामे अद्यापही ही पुर्ण होत नसल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची त्रीव टंचाई भासणार असल्याचे चित्र दिसून येत आहे मनवेल येथे जलजीवन मिशनची कामे अपूर्ण अवस्थेत पडुन आहेत.
पाण्याची टुयुबवेल करून गावात पाईप लाईन करण्यात आली आहे तरी काही कामे पूर्ण झाली असून त्यातील पूर्ण झालेल्या कामांपैकीही पाण्याचा टाकीचे काम अद्याप सुरू आहे जलजीवन मिशनच्या कामाबाबत दिरंगाई होऊन काम कासवगतीने सुरू असल्याने दिसत आहे. १५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. जानेवारी २०२४ मध्ये या कामाचे भुमीपुजन करण्यात आले होते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामे कासकतीने सुरू झाली.
उन्हाळ्यात पाण्यासाठी करावी लागणार कसरत परिसरात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत कामे सुरू असुन पुर्ण होण्यास विलंव होणार असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावून काटकसर करावी लागणार आहे मनवेल गावात सध्या दोन दिवसा आड पाणी पुरवठा असून उन्हाळयात तीन दिवसाआड करावा लागणार आहे असल्याचे सांगण्यात आले. पाण्याच्या टाकीच्या कामाला गती देवून काम पुर्ण करून उन्हाळ्यात होणारी पाण्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी काम लवकर पुर्ण करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे
*****************
पाण्याची टाकी क्षमता ८६ हजार लीटर आहे ठेकेदार यांना गावातील पाण्याची उन्हाळ्यात भाषणारी पाणी टंचाई बाबत वांरवार सुचना दिल्या असून दोन महिन्यात काम मार्गी लागणार आहे
भरत पाटील ग्रामसेवक मनवेल
No comments