adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोहन शर्मा यांची भाजपा बुलडाणा जिल्हा निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती

  मोहन शर्मा यांची भाजपा बुलडाणा जिल्हा निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूरः- भाजपाचे प्र...

 मोहन शर्मा यांची भाजपा बुलडाणा जिल्हा निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूरः- भाजपाचे प्रदेश सदस्य व जिल्हयाचे माजी संघटन मंत्री मोहन शर्मा यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या बुलडाणा जिल्हा निवडणूक प्रमुख व सहजिल्हा निवडणूक प्रमुख समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती भाजपा प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांनी एका पत्राद्वारे केली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटनात्मक मंडळ रचना पुर्ण करण्याकरीता जिल्हा निवडणूक प्रमुख व सहजिल्हा निवडणूक प्रमुख समितीची नियुक्ती करण्यात आली असून बुलडाणा जिल्हयाच्या निवडणूक जिल्हा प्रमुखपदी मोहन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने मंडल निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.बुलडाणा जिल्हयाची जवाबदारी देण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे.

No comments