राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोपडा तर्फे 'ईद मिलनच्या 'कार्यक्रमाचे आयोजन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज छत्रपती ...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोपडा तर्फे 'ईद मिलनच्या 'कार्यक्रमाचे आयोजन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज छत्रपती शिवाजी महाराज चौक चोपडा येथे सुनिल पाटील (वाळकी)मा़.जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व मा.जि.प.सदस्य.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोपडा आयोजित 'ईद मिलन 'कार्यक्रमात ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांचे सर्वधर्म समभाव व धर्मनिरपेक्ष विचारांचा मुस्लिम समुदायाने स्वागत केले.ईदच्या पावन पर्वात बंधुभाव,प्रेम,शांततेचा संदेश समाजात गेला. सर्व धर्माचे लोकांचा सहभाग चोपड्याच्या सामाजिक सलोख्याचे दर्शन ह्या निमित्ताने घडले.मशीद,घरी व ईदगाह येथे ईद उल फितर ची नमाज अदा करुन बहुसंख्य मुस्लिम बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात येउन सर्व समाजातील लोकानां गळाभेट घेत होते.ईद च्या पवित्र उत्सवात बहुसंख्य रोजदार उपस्थित होते.ह्या प्रसंगी प्रवीणभाई गुजराती (संचालक जिल्हा सहकार बोर्ड)परेश देशमुख(जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)निलेश पाटील(मा.संचालक चो.सा.का)कृषीभुषण हिरालाल पाटील(संचालक चोपडा सुतगिरणी)अक्रमभाई तेली(प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग),रमाकांत बोरसे संचालक सुतगगिरणी, मिलिंद सोनवणे शहराध्यक्ष याप्रसंगी उपस्थित होते
No comments