महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे यावल कृषी अधिकाऱ्यांना निवेदन भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) केळीच्या बु...
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे यावल कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
केळीच्या बुकिंग केलेल्या रोपांची वेळेवर वितरण न होणे आणि शेतकऱ्यांना होणारी मानसिक फसवणूक
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना रावेर लोकसभाच्या वतीने कृषी विभाग अधिकारी भरत वारे यांना निवेदन देण्यात आले आहे. केळी पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी विविध ठिकाणाहून आणि कंपन्यांकडून केळीची रोपे बुक केलीली आहेत. मात्र, बुकिंग केलेली रोपे शेतकऱ्यांना वेळेवर न मिळणे, एजन्सी आणि कंपनीकडून आवश्यक सेवा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागणे, आणि बुकिंग पावत्या न दिल्या जाणे यामुळे शेतकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी जेव्हा रोपे बुक केली आहेत, तेव्हा त्यांना त्या रोपांची वितरण वेळेवर होणं आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य वेळी पिकांची लागवड करता येईल. हे लक्षात घेतल्यास, कंपन्या आणि एजन्सीच्या असंवेदनशील कारभारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. अनेक ठिकाणी बुकिंग फॉर्मची माहिती न देणे, पावती न देणे आणि शेतकऱ्यांना रोपे न मिळवून देणे यासारख्या घटना घडत आहेत.
तसेच, निवेदनात डिलर्स,एजन्सी, बुकिंग करणारे दुकानदार यांचा मनमानी कारभाराविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यावल शाखेने संबंधित अधिकारी आणि कंपन्यांवर दबाव आणण्याचे ठरवले आहे.
यावेळी मनसे शेतकरी सेना जिल्हा सचिव अमोल पाटील, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार,योगेश कोळी,निखिल पाटील, महाराष्ट्र सैनिक आणि मोठ्या सख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते
.jpg)
No comments