अवैध गौण खनिजाची सर्रासपणे वाहतूक हिंगोणा परिसरात अवैध वाळू उत्खनन; महसूल विभागाच्या तिजोरीवर डल्ला ? यावल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
अवैध गौण खनिजाची सर्रासपणे वाहतूक
हिंगोणा परिसरात अवैध वाळू उत्खनन; महसूल विभागाच्या तिजोरीवर डल्ला ?
यावल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यात हिंगोणा परिसरात अवैध गौण खनिजाची सर्रास चोरटी वाहतूक केली जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. याकडे महसूल विभागाने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे.
यावल तालुक्यातील हिंगोणा, भालोद, न्हावी या गावातून मध्यरात्रीच्या वेळेस विना परवाना जेसीबीचीच्या साहाय्याने खोदकाम करून ट्रॅक्टरमध्ये अनधिकृत वाळूची वाहतूक केली जात आहे. परिसरात जोमाने सुरू असलेल्या बांधकामांवरही वाळू वापरली जात आहे. या सर्व प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वाळूची व माती वाहतूक करणाऱ्या डंपर व ट्रैक्टर चालकाकडे वाहतुकीचा परवाना आहे किंवा नाही, या .बाबत किमान महसूलच्या कर्मचाऱ्यांकडून साधी चौकशी देखील केली जात नसल्याचे दिसून येत आहे. या अनधिकृत गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांना
राजकीय पाठबळ असल्याचे ते चांगलेच मस्तावले असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील नदीपात्रात जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे खड्डे पाडण्यात येतात. त्यातून मातीची मोठी वाहतूक केली जाते. हिंगोणा गावातील या अनधिकृत गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी . किमान एका दिवसाला १० ते २० डंपर वाहतुक करतांना दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर वाहनधारक मंडळी यात सहभागी आहेत. यामुळे हा धंदा राजरोसपणे सुरु आहे.हा परिसर भालोद महसूल मंडळाच्या नियंत्रणात येतो. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अनधिकृत
वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच यावल तहसिलदार यांनी लक्ष केंद्रीत करून ही होणारी अवैध वाहतुक थांबवावी अशी मागणी होत आहे .

No comments