मोकाट श्वानांचा बंदोबस्त करा ए आय एम आय एमची मागणी. (जळगाव प्रतिनिधी शेख जावीद) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शहरातील बऱ्याच वसाहतीमध्ये आण...
मोकाट श्वानांचा बंदोबस्त करा ए आय एम आय एमची मागणी.
(जळगाव प्रतिनिधी शेख जावीद)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शहरातील बऱ्याच वसाहतीमध्ये आणि मुख्य रस्त्यावर मोकाट श्वानांचा सुळसुळाट पाहावयास मिळत आहे ही मोकाट फिरणारी श्वानं झुंड बनवून फिरत असतात त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे शहरांमध्ये काही वर्षांपूर्वी अशाच मोकाट श्वानांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या होत्या रात्रीच्या वेळी खास करून मुख्य रस्त्यावर श्वानांचे झुंडचे झुंड पहावयास मिळतात वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लवकरात लवकर या श्वानांचा बंदोबस्त करावा असे निवेदन ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन महिला व युवकांतर्फे देण्यात आले आहेवाहनधारकांना त्रास रस्त्यावर वाहनधारकांना जात असताना हे श्वान पाठलाग करतात या श्वानाने चावा घेऊ नये या भीतीने वाहनधारक सुसाट वेगाने वाहन चालवतात व भीतीमुळे घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे अपघात होऊन वाहनधारकांना इजा होत आहे वेळीच उपाययोजना करून वाहनधारकांना होणारा त्रास दूर करावा असे नागरिकांतर्फे मागणी होत आहेमहिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण शहरातील विविध परिसरामध्ये आणि मुख्य रस्त्यावर श्वानांचे झुंड असतात त्यामुळे घराबाहेर पडण्यासाठी देखील महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महिलांना बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी सोबत कोणी असेल तरच निघण्याची वेळ आली असून ही मोकाट श्वान अंगावर धावून येतात लहान मुलांना खेळताना देखील भुंकतात त्यामुळे लहान मुलं घाबरत आहेत
मुख्य उद्यान अधीक्षक यांना निवेदन सादर शहरातील सिद्धार्थ उद्यानांमध्ये मुख्य उद्यान अधीक्षक यांना एआयएमआयएम शिष्टमंडळाने दिनांक 26 बुधवार रोजी निवेदन सादर करत त्वरित मोकाट श्वानांचा बंदोबस्त करा अशी मागणी केली त्वरित कारवाई करणार मुख्य उद्यान अधीक्षक ए आय एम आय एम ने निवेदन सादर केल्यानंतर संपूर्ण मुद्द्यावर मुख्य उद्यान अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर या गंभीर विषयाकडे जातीने लक्ष घालून त्वरित कार्यवाही करणार असल्याचे मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले श्वान पकडणारे एक अतिरिक्त वाहन देखील वाढवणार असून कर्मचाऱ्यांच्या फेऱ्या आणि वेळ वाढवून ज्या ठिकाणी अशा तक्रारी आहेत त्या ठिकाणी लवकरच अडचणी सोडवल्या जातील असेही श्री पाटील यांनी आश्वासित केले हे पदाधिकारी होते उपस्थित ए आय एम आय एम सिस्टमंडळामध्ये नगरसेवक अबुल हसन हाश्मी,युवा जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान,महिला शहर कार्याध्यक्ष अंकिता गजहास,युवा जिल्हा महासचिव शेख कलीम,सय्यद युसुफ,वसीम सिद्दिकी,पुष्कर आहेरकर,शेख मोहसीन,रफीक पटेल आदी उपस्थित होते
No comments