पाचोरा शहरातील ऑनलाइन चक्री विरोधात पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची दबंग कारवाई साहित्य जप्त एक आरोपी अटक. जळगाव प्रतिनिधी शेख जावीद...
पाचोरा शहरातील ऑनलाइन चक्री विरोधात पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची दबंग कारवाई साहित्य जप्त एक आरोपी अटक.
जळगाव प्रतिनिधी शेख जावीद
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पाचोरा येथील पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी पाचोरा शहरातील अवैध चक्रीधंद्यांविरोधात कारवाईचा धडका सुरू केला असून गुप्त माहितीच्या आधारे २३ मार्च रोजी रात्री अचानक छापा टाकून चक्रीवर वापरण्यात येणारे ४० हजार रुपयांचे संगणक व एलईडी टीव्ही जप्त करण्यात आले आहेत चक्री चालवणारा आरोपी घटना स्थळा वरून फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहिती नुसार, २३ मार्च रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास पोलीस निरीक्षक अशोक पवार हे नियमित गस्त घालत असताना राजीव गांधी टॉऊन हॉल मागील एका दुकानात संगणक व एलईडी स्क्रीनवर चक्री सुरू असल्याची माहिती मिळाली लगेचच पोलीस पथकाने घटना स्थळी धाव घेऊन छापा टाकला छाप्या वेळी नागरिकांनी पळ काढला मात्र पोलिसांनी दुकानातून दोन स्मार्ट एलईडी टीव्ही आणि दोन सीपीयू असे एकूण ४०,००० रुपयांचे साहित्य जप्त केले.या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी यांच्या फिर्यादीवरून अविनाश खंडू सूर्यवंशी (रा. पाचोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यासोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील आणि वाहनचालक पोलीस हेड कॉन्स्टेबल समीर पाटील यांनी सहभाग घेतला पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमे मुळे पाचोरा शहरातील चक्री धंदा चालवणाऱ्यां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी सांगितले की अशा अवैध व्यव सायांवर कारवाई सुरूच राहील अशा म्हटले आहे

No comments