Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणा-या 5 कॅफेवर रेड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

  अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणा-या 5 कॅफेवर रेड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायक...

 अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणा-या 5 कॅफेवर रेड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.30 एप्रिल):-अहिल्यानगर शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली तरूणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणा-या 5 कॅफे चालकांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे.दि.29 एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील नगर कल्याण रोडवरील द परफेक्ट कॅफे,सारसनगर ते वाकोडी जाणारे रोडलगत बेलाचाव कॅफे,सावेडी गावातील पंपींग स्टेशनजवळील आँरिगेनो कॅफे,कोहिनूर मॉलजवळील झेडके कॅफे व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील स्टेट बँक चौक येथील वननेस कॅफे अशा ठिकाणी पंचासमक्ष जावुन खात्री केली असता तरुण मुल मुली अश्लील चाळे करताना मिळुन आले.पथकाने वर नमूद कॅफे चालकास कॅफे चालविण्याचा परवाना बाबत विचारपुस करता त्यांनी कॉफी शॉपचा परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावुन कुठलीही कॉफी,पेय अगर खाद्यपदार्थ विक्रीस न ठेवता आतमध्ये मुलामुलींना बसण्यासाठी व अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. पथकाने कॅफे चालक नामे 1) महेश पोपट खराडे,वय 23, रा.नालेगाव,अहिल्यानगर (परफेक्ट कॅफे) 2)आसिफ आयाज शेख,वय 26, रा.भोसले आखाडा, बुरूडगाव, अहिल्यानगर 3)विशाल विष्णु वाघ,वय 18, रा.बुरूडगाव रोड, अहिल्यानगर 4)मंगेश भरत आजबे,वय 19, रा.बुरूडगाव रोड,अहिल्यानगर 5)महेश शंकर दरंदले, रा.चिपाडेमळा, अहिल्यानगर फरार (बेलाचाव कॅफे) 6)अविनाश विलास ताठे, वय 32, रा.ताठेनगर,सावेडी,  अहिल्यानगर  (ऑरिगेनो कॅफे)  7) मंगेश  रमेश  देठे,वय 19,  रा.भगवती  कोल्हार,ता.राहाता, जि.अहिल्यानगर 8)महेश सातपुते,रा.अहिल्यानगर फरार (झेडके कॅफे)9)कृष्णा अनिल कराळे,वय 19, रा.तपोवन रोड, ज्ञानसंपदा शाळेच्या पाठीमागे, अहिल्यानगर (वननेस कॅफे) यांचे विरूध्द कारवाई करुन कोतवाली,तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129, 131 (क) प्रमाणे 05 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पथकाने वर नमुद कॅफेमध्ये मिळुन आलेल्या तरुण मुला मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले आहे.गुन्हयाचा पुढील तपास कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हे करत आहे.

सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, विश्वास बेरड,पंकज व्यवहारे, शाहीद शेख,गणेश धोत्रे,विजय ठोंबरे,शिवाजी ढाकणे,आकाश काळे,जालींदर माने,मयुर गायकवाड,भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर,ज्योती शिंदे यांनी केलेली आहे.

No comments