साकळी येथील जैन बांधवांकडून 'विश्व नवकार महामंत्र दिवस' भक्तिमय वातावरणात साजरा भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
साकळी येथील जैन बांधवांकडून 'विश्व नवकार महामंत्र दिवस' भक्तिमय वातावरणात साजरा
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवाच्या पावन पर्वाच्या निमित्ताने साकळी येथील जैन समाज बांधव यांच्या वतीने दि.९ एप्रिल रोजी ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.या दिवसाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झालेले होते.
या आध्यात्मिक कार्यक्रमाचा प्रारंभ दि.९ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते ९ वाजुन ३६ मिनिटांपर्यंत सामूहिकरित्या नवकार महामंत्राचा जप करण्यात आला.संपूर्ण जगभरातील १०८ देशांतील तसेच भारतातील लाखो श्रद्धावान नागरिक एकत्र येऊन सामूहिक जपात सहभागी झाले.या कार्यक्रमा अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे उपस्थित होते.हे या दिवसाचे प्रमुख आकर्षण होते. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश जागतिक शांतता, सहिष्णुता व मानवतेचा संदेश जगभर प्रसारित करणे हा होता.दुसऱ्या दिवशी मंदिरात भगवान महावीर जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
नवकार महामंत्र जैन धर्मातील सर्वात पवित्र मंत्र असून तो आत्मशुद्धी, मानसिक शांती आणि अहिंसा यांचे प्रतीक मानला जातो. चैत्र महिन्यात या मंत्राचा जप अधिक प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच भगवान महावीर स्वामींच्या जन्मकल्याणक निमित्त या मंत्रजपाचे आयोजन करण्यात होते.

No comments