adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रयत्न करा यश मिळेलच:- विजयकुमार पाटील. किनगाव इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे वार्षिक बक्षिस वितरण व विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न.

प्रयत्न करा यश मिळेलच:- विजयकुमार पाटील. किनगाव इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे वार्षिक बक्षिस वितरण व विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम...

प्रयत्न करा यश मिळेलच:- विजयकुमार पाटील. किनगाव इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे वार्षिक बक्षिस वितरण व विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न.


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

किनगाव येथील इंग्लिश मिडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये नुकताच वार्षिक बक्षीस वितरण व विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार देवचंद पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त सचिव व चेअरमन वसंतराव पाटील होते तसेच स्कूलचे सचिव व व्हि मार्ट शॉपींग मॉलचे संचालक मनिष विजयकुमार पाटील मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील उपमुख्याध्यापक सुहास भालेराव इ. व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येचे दैवत माता सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले तदनंतर चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील व वसंतराव पाटील यांच्या हस्ते इ.१ ली ते इ.१० वीच्या खेळासह वेगवेगळ्या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात गौरवण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना जे विविध विषयातील प्रोजेक्ट देण्यात आले होते त्यांचे प्रदर्शन देखील भरविण्यात आलेले होते कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक  अशोक प्रतापसिंग  पाटील उप मुख्याध्यापक सुहास भालेराव पर्यवेक्षिका सौ.राजश्री सुभाष अहिरराव यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास बहुतांशी  पालकांनी आपली उपस्थिती दर्शविली विद्यार्थ्यांनी बरेच विषय या प्रदर्शनात सादर केलेले होते जसे की पावसाचा पाण्याचा पुनः वापर आपला परिसर कसा स्वच्छ ठेवावा आधुनिक आणि पारंपरिक शेती प्रदूषणावरील उपाय सौर ऊर्जेचा वापर कचऱ्याची विल्हेवाट मोबाईल दुष्परिणाम असे अनेक विषय विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगातून विज्ञान प्रदर्शनामध्ये  दाखवलेले होते प्रदर्शनामधील प्रतिकृती पाहत असताना शाळेचे सचिव मनीष पाटील मुख्याध्यापक अशोक पाटील  

 तसेच इतर शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रेक्षकांसमोर मांडली या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता १ ली पासून तर इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता यावेळी विजयकुमार पाटील म्हणाले की जे विद्यार्थी प्रयत्न करतील त्यांना नक्कीच यश मिळेल आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर वसंत पाटील यांनी देखील आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आपल्या कामाशी प्रामाणिक राहून सदैव प्रयत्न केले पाहिजेत जरी आपल्याला आज बक्षीस मिळाले नसेल तर ते उद्या नक्कीच मिळेल बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आपल्या मध्ये फरक एवढाच असतो की ते आपल्यापेक्षा फक्त एक पायरीने पुढे आहेत आणि हे अंतर प्रयत्नांनी कमी करता येऊ शकते तसेच इयत्ता १ ली ते इयात्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनमध्ये ज्यांनी विविध खेळासह विविध क्षेत्रात व स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तर इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव मनिष विजयकुमार पाटील मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील उपमुख्याध्यापक सुहास भालेराव व शिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्हाला असेच यश मिळत राहो आणि तुम्ही तुमच्या आई-वडिलांचे शिक्षकांचे आणि शाळेचे नाव उच्चस्तरावर घेऊन जावो अशा शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली कासार यांनी केले व आभार योगिता सावळे यांनी मानले तर या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक हर्षल मोरे, योगिता बिहारी, देवयानी साळुंखे, मिलिंद भालेराव, भावना चोपडे, राजश्री अहिराव, प्रतिभा धनगर, गोपाल चित्ते, पवन कुमार महाजन,सोनाली कासार, प्रतिभा पाटील, योगिता सावळे, रोहित बाविस्कर, मयुरी बारी, वैशाली मराठे, माधुरी तळेले, तीलोत्तमा महाजन, सचिन सोनवणे, रामकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर धनगर, ऐश्वर्या सोनार, नूतन देशमुख, सोनाली वाणी.पुरुषोत्तम पाटील निलेश महाजन गोकुळ धर्माधिकारी यांनी परिश्रम घेतले.

(वसंतराव पाटील हे मुळचे पाष्टे ता.शिंदखेडा येथील रहिवासी असून त्यांचे लहानपणी शिक्षण मामांच्या गावी म्हणजे किनगाव येथे झालेले होते ते सध्या पुणे येथे वास्तव्याला आहेत त्यांची आधी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदार निवड झाली व सेवेदरम्यान त्यांनी शिक्षणही सुरू ठेवले व सैन्य दलातील सेवेनंतर त्यांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षण विभागात सचिव म्हणून सेवेची संधी मिळाली शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे असलेले वसंतराव पाटील एस.एस.सी.बोर्डाचे संचालक व नंतर शिक्षण विभागाचे चेअरमन झाले तर महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे मंत्रालयातील ते सचिव ही होते )

No comments