सुकी नदी पुलावर कारची दुचाकीला धडक एक ठार दोन गंभीर जखमी रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंकलेश्वर- बऱ्हाणपुर- ...
सुकी नदी पुलावर कारची दुचाकीला धडक एक ठार दोन गंभीर जखमी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंकलेश्वर- बऱ्हाणपुर- राष्ट्रीय महामार्गावर मोठा वाघोदा वडगांव दरम्यान च्या सुकी नदीच्या पुलावर दि १४एप्रिल रोजी सायंकाळी मोटरसायकल व ब्रिझा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वडगाव येथील जावेद सत्तार तडवी (वय ३९) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. गावात अपघाताची बातमी समजताच वडगाव गावावर शोककळा पसरली आहे सविस्तर असे की दि १४एप्रिल सोमवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वडगाव येथील जावेद सत्तार तडवी, वसीम करीम (वय ३०) व बबलू अशरफ तडवी (वय २७) हे तिघे जण सुझुकी मोटरसायकल (MH ४८ BX ७९२६) वरून वडगांव येथून मोठा वाघोदा मार्गे सावदा येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून परत येत असताना सुकी नदी पुलाजवळ रावेरहून सावदाकडे जाणाऱ्या ब्रिझा कार (MH १९ CY १००७) ने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात जावेद तडवी यांचा जागीच मृत्यू झाला असून वसीम करीम व बबलू अशरफ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून दोघांनाही गंभीर दुखापती असल्यामुळे पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.सावदा पोलीस सपोनि विशाल पाटील उपनिरीक्षक अमोल गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद पाटील पुढील तपास करीत आहेत

No comments