adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भीमक्रांती सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन,डीजेला फाटा देत भव्य भोजनदानाचा कार्यक्रम संपन्न

  भीमक्रांती सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन,डीजेला फाटा देत भव्य भोजनदानाचा कार्यक्रम संपन्न   सचि...

 भीमक्रांती सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन,डीजेला फाटा देत भव्य भोजनदानाचा कार्यक्रम संपन्न  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि१४):-पाईपलाईन रोड येथील सुखसागर कॉलनी मध्ये भीमक्रांती सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते.यावेळी मा.नगरसेविका दिपालीताई बारस्कर म्हणाल्या की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण संविधान आणि समाज परिवर्तन या माध्यमातून देशाला दिशा देण्याचे काम केले.


तसेच मा.नगरसेवक सागर बोरुडे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 'शिका संघटित व्हा संघर्ष करा' हा जो मूलमंत्र दिला यात आजही ऊर्जा आहे.व प्रतिष्ठानच्या वतीने डीजेला फाटा देत भव्य भोजनदानाचा जो कार्यक्रम केला हिच परंपरा कायम चालू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी बुद्ध वंदना घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांना भव्य भोजनदान देऊन मिस्टन्नचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे महेश देठे,अनिल ठोकळ,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, पत्रकार सचिन दसपुते,शंकर शेवाळे,संजय जाधव,डी.सी.सोनवणे,सुनील मोकळ,रुपवते मॅडम,पवार मॅडम,सविता ठोकळ,गरुड साहेब,प्रल्हाद थोरात,सुनील साळवे,जाधव सर,विक्रम साठे, संदीप मस्के,तुषार डफळ,शेखर तुंगार,योगेश ठुबे,सिद्धार्थ मोकळ,गौरव ठोकळ,राजेंद्र ब्राह्मणे,सुनील ठोकळ,प्रियंका गायकवाड,सोनवणे मॅडम, साळवे मॅडम,आदिसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.आर.सातपुते सर यांनी केले.


No comments