adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगावात रंगला कुस्त्यांचा जोरदार आखाडा.. ▪️महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व भारत केसरी शमशाद शेख यांच्यात थरार

  धरणगावात रंगला कुस्त्यांचा जोरदार आखाडा.. ▪️ महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व भारत केसरी शमशाद शेख यांच्यात थरार  विकास पाटील धरणगाव ...

 धरणगावात रंगला कुस्त्यांचा जोरदार आखाडा..

▪️महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व भारत केसरी शमशाद शेख यांच्यात थरार 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : हनुमान जयंतीनिमित्त आज रोजी खऱ्या कुस्त्यांचा आखाडा धरणगावातील इंदिरा गांधी विद्यालयाच्या मैदानात रंगला. या मैदानात चांदीची गदा व १ लाख रुपये बक्षिसाची कुस्ती पुणे येथील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, दिल्ली येथील भारत केसरी शमशाद शेख यांच्यात चितपट न होता बरोबरीने सोडण्यात आल्याने दोघंही मल्लांना चांदीची गदा आणि १ लाख रुपये रोख विभागून देण्यात आले. तसेच ठेक्याचे ६२ मल्लांची रंगतदार कुस्त्या झाल्या. तत्पूर्वी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेनेचे नेते गुलाबराव वाघ, भाजपचे नेते तथा उद्योजक भगवान महाजन, भाजपचे नेते ॲड. संजय महाजन, नगराध्यक्ष निलेश चौधरी, नपाचे गटनेते विनय भावे, नगरसेवक कैलास माळी, शहरप्रमुख विलास महाजन, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन ॲड.व्ही एस भोलाणे, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, महेंद्र महाजन, भागवत चौधरी, ॲड. शरद माळी यांसह उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्ते आखाड्याचे व हनुमंतरायाच्या प्रतिमेचे पूजन करून कुस्त्यांची सुरूवात करण्यात आली.

         या आखाड्याच्या निमित्ताने लोकसभा, विधानसभा, असो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परस्परविरोधी भूमिका घेणारे राजकीय नेते कुस्ती आखाड्यात खिलाडूपणे सहभागी झाले. त्यामुळे राजकीयदृष्ट्या महत्व असलेल्या गावांत पुन्हा एकदा एकोपा निर्माण झाला. म्हणून धरणगावात कुस्तीला विशेष महत्व आहे. गेल्या दहा वर्षांपासून चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने कुस्त्या आयोजित केल्या जातात. कुस्त्यांची सुरुवात ५०० रुपयांच्या लहान मल्लांपासून शेवटची कुस्ती चांदीची गदा व रोख स्वरूपात १ लाख रुपये बक्षिसाची होती. देशातील, राज्यभरातील नामांकित मल्ल या आखाड्यात हजेरी लावतात. त्यामुळे धरणगावच्या कुस्ती आखाड्याचा नावलौकिक आहे. या फडात सर्वच स्तरातील नागरिक आणि सर्वच राजकीय पक्षाचे नेते आपले राजकीय मतभेद विसरून कुस्तीला बळ देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे गावात राजकारणाच्या पलीकडे कुस्तीचा रगेल आखाडा अजूनही टिकून असल्याचे आखाड्याचे संयोजक तथा चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिलीप पहिलवान महाजन यांनी सांगितले. तसेच गावात खेळताना लोकांचे जितके प्रेम असते त्याहीपुढे जिंकण्याच्या अपेक्षांचा दबाव असतो, असे कुस्तीचे पंच किशोर पहिलवान, अनिल पहिलवान, रघुनाथ पहिलवान, शाहरुख पहिलवान यांनी सांगितले. कुस्तीचे आयोजन यशस्वीतेसाठी चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिलीप महाजन, उपाध्यक्ष अनिल महाजन, चंद्रकांत सोनार, खजिनदार पप्पू कंखरे, सह खजिनदार राजेंद्र वाघ, सचिव गुलाब महाजन, सहसचिव किशोर पवार, सदस्य प्रकाश मराठे, नंदू करोसिया, विनोद माळी, किशोर महाजन, कोमल शुक्ल, शाहरूख खाटिक, गोरख माळी, भावेश पाटील, जगदिश मराठे, ईश्वर चौधरी, भागवत मराठे, चंदन पाटील, हरी महाजन, गोपाल पाटील, ललित मराठे, रघुनाथ माळी, अनिल महाजन, रमेश महाजन, सुरज सूर्यवंशी यांसह मंडळाचे सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद रोकडे यांनी तर सूत्रसंचलन पी डी पाटील यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे, पहिलवानांसह कुस्तीप्रेमींचे आभार ॲड. संजय पहिलवान महाजन यांनी मानले.

No comments