अवैध ऑनलाईन बिंगो अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक-:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि२४):शेवगाव येथे अवै...
अवैध ऑनलाईन बिंगो अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि२४):शेवगाव येथे अवैध ऑनलाईन बिंगो चालणाऱ्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत 3 आरोपीकडून 1 लाख 03,760/- रू.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार अशांचे पथक तयार करुन शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.पथक शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गोपणीय माहिती मिळाली की,हॉटेल जय मातादी समोर,मोची गल्ली, शेवगाव येथे इसम नामे काळु कुसळकर व सुरज कुसळकर हे त्यांचे हस्तकामार्फत एका टपरीमध्ये टीव्ही स्क्रीनवर बिंगो जुगार लोकाकडून पैसे घेऊन खेळत व खेळवित आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी छापा टाकुन बळीराम भानुदास मोहिते, वय 25, रा.वडारगल्ली,शेवगाव, ता.शेवगाव,सोहेल रफीक शेख, वय 26, रा.नायकवाडी मोहल्ला, शेवगाव, ता.शेवगाव,मोहसीन सलीम शेख, वय 30, रा.ईदगाह मैदान,शेवगाव, ता.शेवगाव अशांना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीकडे बिंगो चालविणाऱ्या मालकाचे नाव विचारले असता त्यांनी काळु उर्फ गोपाळ कुसळकर, रा.वडारगल्ली, शेवगाव (फरार) व सुरज कुसळकर, रा.वडारगल्ली,शेवगाव (फरार) असे असल्याचे सांगीतले.तसेच बिंगो जुगारासाठी लागणारे आयडी पासवर्ड हे अशपाक शेख रा.श्रीरामपूर, ता.श्रीरामपूर (फरार),समीर कुरेशी, रा.राहाता, ता.राहाता (फरार),अफरोज शेख,रा.श्रीरामपूर,ता.श्रीरामपूर (फरार) 9) महादेव उर्फ पांडुरंग कुत्तरवाडे,रा.सोनई,ता.नेवासा, (फरार) व सलीम शेख, रा.शेवगाव,ता.शेवगाव (फरार) यांचेकडून घेतले असल्याची माहिती सांगीतली.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून एकुण 1,03,760/- रू किंमत त्यात एलईडी टीव्ही,सीपीयु, माऊस, कीबोर्ड,4 मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपीतांना मुद्देमालासह शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येऊन त्यांचेविरूध्द शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं 362/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक,श्री. सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अशोक लिपणे,बाळासाहेब नागरगोजे,शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ यांनी केलेली आहे.

No comments