चौगाव येथील डाॅ.दिपक धनगर एम.डी.प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विश्राम तेले चौगाव ता.चोपडा प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड -चौगाव येथील प्रगत...
चौगाव येथील डाॅ.दिपक धनगर एम.डी.प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
विश्राम तेले चौगाव ता.चोपडा प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
-चौगाव येथील प्रगतिशील शेतकरी पांडुरंग पुंडलिक धनगर यांचे सुपुत्र डॉ दिपक पांडुरंग धनगर हे एस जे जी मेडिकल काॅलेज जि. कोप्पल, कर्नाटक मधून एम डी (बालरोग तज्ञ) ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
त्यांची बी.ए.एम.एस पदवी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स येथून झाली आहे. ग्रामिण भागात राहून एक शेतकरी कुटुंबातील दिपक यांनी डॉक्टर व्हावे अशी इच्छा त्यांचे आजोबा कै.पुंडलिक रावा धनगर यांची होती.आज आजोबा हयात नसले तरी खर्या अर्थाने आजोबांचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद डॉ दिपक यांनी त्यांच्या चौगाव येथील सत्कार प्रसंगी बोलून दाखवला.
डॉ दिपक धनगर यांच्या यशा नंतर त्यांच्या जन्मगावी चौगाव येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सर्व कंखरे परीवार, माजी सभापती बापुराव पाटील, क्रुषी विस्तार अधिकारी सतिष कोळी,श्रीराम पिक संरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र पाटील, पोलिस पाटील गोरख पाटील,,माजी उपसरपंच सुनील पाटील , रुषीकेश पाटील,चंद्रकांत धनगर,विजय पारधी,मनोहर पाटील, विश्राम तेले, गोपीचंद धनगर, मनोहर धनगर,सोनूसिंग पाटील, कैलास कंखरे, पांडुरंग धनगर, धनराज धनगर, युवराज धनगर, बापुराव धनगर संपूर्ण कंखरे परीवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




No comments