adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात फरार आरोपी सुरज (उर्फ) बापू गोसावी ला वालचंदनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात फरार आरोपी सुरज (उर्फ) बापू गोसावी ला वालचंदनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या   वालचंदनगर पोलिसांची दमदार ...

 बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात फरार आरोपी सुरज (उर्फ) बापू गोसावी ला वालचंदनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 वालचंदनगर पोलिसांची दमदार कामगिरी 


 संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पुण्यातील बोपदेव घाटातील 3 ऑक्टोंबर 2024 रोजी 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र देखील चांगलाच हादरला होता, आणि याच प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वालचंदनगर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. (सुरज उर्फ बापू दशरथ गोसावी ) असे या आरोपींचे नाव आहे, यामध्ये आणखीन एक आरोपी फरार आहे. पुण्यातील बाबदेव घाटात 3 ऑक्टोंबर 2024 रोजी 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात एका आरोपींला अकलूजमधून ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यातील बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपी सुरज (उर्फ) बापू दशरथ गोसावी (रा. भवानीनगर संसर ता. इंदापूर जि. पुणे ) आरोपी हा अकलूज ता. माळशिरस येथील जुन्या बस स्टॅन्ड वरून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत गोसावीला ताब्यात घेतले सदर आरोपीस वालचंदनगर पोलिसांनी पुढील कारवाईसाठी या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पुणे शाखा युनिट 5 यांच्या ताब्यात देण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुगणे पोलीस हवालदार गुलाबराव पाटील शैलेश स्वामी सचिन गायकवाड पोलिस अंमलदार अभिजीत कळसकर विक्रम जाधव गणेश वानकर यांनी केली आहे. या घटनेतील तीन आरोपींचा शोधत गुन्हे शाखा आणि इतर 700 पोलीस कर्मचारी अधिकारी काम करीत आहेत.

No comments