संविधान फलक लावणारी... साकळी ग्रामपंचायत ठरू पाहते आहे एकमेव ग्रामपंचायत ! भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) साकळी ...
संविधान फलक लावणारी... साकळी ग्रामपंचायत ठरू पाहते आहे एकमेव ग्रामपंचायत !
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
साकळी ता.यावल।- विश्वरत्न,भारतरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९ ४७ ला भारताचे संविधान देशाला समर्पित केले तो दिवस भारतासाठी एक सुवर्णदिवस म्हणून ओळखला जाऊन हाच दिवशी संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. संविधान हे केवळ एक कायदा नाही, तर ते देशाच्या नागरिकांच्या जीवनाचे आधारस्तंभ आहे. ते नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करते आणि देशाच्या विकासासाठी एक मजबूत पाया तयार करते.या संविधानाचे मानवी जीवनात त्यांच्या जडणघडणीत किती महत्त्व आहे तसेच या संविधानातील प्रत्येक बाब सदैव स्मरणात राहावी व या संविधानाच्या उद्देशिकाप्रमाणे आपल्या प्रशासनाचा कारभार चालवा. या उद्देशानेच साकळी ग्रामपंचायत लोकप्रिय सरपंच दीपक नागो पाटील यांनी आपल्या दूरदृष्टीकोनातून आपल्या साकळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात भारताच्या संविधानाची उद्देशिकाचा सुंदर फलक लावण्याचा निर्णय घेतला. व तो निर्णय त्यांनी दि.१४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी प्रत्यक्ष साकारला ही बाब साकळी ग्रामपंचायतीच्या इतिहासासाठी सुवर्ण अक्षरांनी अधोरेखित करणारी बाब ठरली आहे.त्यांनी संविधानाची उद्देशिका सभागृहाच्या अगदी दर्शनी भागात व मोठ्या स्वरूपात लावून एक आकर्षक व प्रेरणादायी असे स्वरूप या सभागृहाला देण्यात आलेले आहे.या उद्देशिकाचे अनावरण दि.१४ एप्रिल रोजी करण्यात आले.या प्रेरणादायी व स्मरणिय अशा कृतीमुळे सरपंच दिपक पाटील यांचे तसेच त्यांच्या संपुर्ण प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकणच भारतीय संविधानाची उद्देशिकाची लावणारी साकळी ग्रामपंचायत ही एकमेव ग्रामपंचायत ठरू पाहत आहे!

No comments