हिंगोणा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेतील जलकुंभाचे काम सहा वर्षा पासून पूर्ण होईना. यावल पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचे पद्धतशीरपणे दुर्लक्ष ? आम...
हिंगोणा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेतील जलकुंभाचे काम सहा वर्षा पासून पूर्ण होईना.
यावल पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचे पद्धतशीरपणे दुर्लक्ष ?
आमदार अमोल जावळे यांनी लक्ष देण्याची मागणी
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गावात तीन जलकुंभ असून त्या जलकुंभांना चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाल्यामुळे त्या जलकुंभांची मुदत संपली असून जलकुंभ तात्काळ पाडून नवीन बांधकाम करण्यात यावे अशी मागणी गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायतीला नेहमी करीत होते . त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने सन १७/१८ या कालावधीमध्ये शासनाला पत्र दिले मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत गावात नवीन जलकुंभाची उभारणी करावी गावात सन १८/१९ या वर्षात १लाख लिटरचे जलकुंभ मुख्यमंत्री पेयजल योजनेत मंजूर झाले हिंगोणा ग्रामपंचायतीने रितसर जागेचा ठराव पाठवून हे जलकुंभ वि .का .सोसायटी परिसरात उभारणीचे ठरवीले मुख्यमंत्री पेयजल योजना ही ४७ लाख अंदाजीत रक्कम असून या योजनेत नविन जलकुंभ उभारणे गावात वितरण व्यवस्था करणे नवीन एक लाख लिटर जलकुंभाला तार कंपाऊंड करणे असे काम योजनेत आहे . मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर होऊन आज सहा वर्षे पूर्ण होत आहे तरी देखील या योजनेचे काम अपूर्णावस्थेत असून भर उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना या योजनेचा काय फायदा आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी या योजनेचे गत हिंगोणा गावात झाली आहे या योजनेअंतर्गत ४७ लक्ष एवढा निधी मंजुर आहे परंतु पाण्याच्या टाकीचे काम हे कासवगतीने होत असल्याने या योजनेचा ग्रामस्थांना काही एक फायदा होत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे . वरीष्ट अधीकारी यांनी याकडे पद्धतशीर पणे दुर्लक्ष केले असून भिजत घोंगडे करून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत .
जलजीवन योजनेतील जलकुंभ देखील अपूर्ण अवस्था
पाणी साठवणूक करण्यासाठी जलजीवन योजनेअंतर्गत जल कुंभ मंजुरी मिळाली होती या जलकुंभाला देखील चार वर्षे पूर्ण होत असून हे काम देखील अपूर्ण अवस्थेत पडलेले आहे उन्हाची तीव्रता बघता गावात पिण्याच्या पाण्याची समस्या वेळोवेळी उद्भवत असते अशा वेळेस जलकुंभात साठवणुक करण्यात आलेला पाणीसाठा हा ग्रामस्थांसाठी उपयोगाचा ठरतो त्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री पेयजल योजना व जलजीवन योजना या अंतर्गत लाखो रुपयांचा निधी जलकुंभ बांधकामासाठी देण्यात आला परंतु या निधीचा काडीमात्र उपयोग गावासाठी झालेला दिसून येत नाही दोन्ही जलकुंभ अपूर्ण अवस्थेत असून अधिकारी या कामांकडे दुर्लक्ष का करीत आहे .असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच यावल रावेर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी या विषयाकडे लक्ष देऊन अपूर्ण अवस्थेतील जलकुंभ लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे .


No comments