adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरातील गोवंश हत्या,दारू, मटका जुगार, अवैध वाळूसह सर्व अवैध धंदे बंद करा.

  फैजपूरातील गोवंश हत्या,दारू, मटका जुगार, अवैध वाळूसह सर्व अवैध धंदे बंद करा.   मुस्लिम समाज मंचची  निवेदनाद्वारे मागणी  रावेर प्रतिनिधी मु...

 फैजपूरातील गोवंश हत्या,दारू, मटका जुगार, अवैध वाळूसह सर्व अवैध धंदे बंद करा.

 मुस्लिम समाज मंचची  निवेदनाद्वारे मागणी 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील फैजपूर शहरात अनेकानेक अवैध धंद्यांनी थैमान घातले आहे. बिनबोभाटपणे सुरू असलेल्या गोवंश हत्या, अवैध वाळू वाहतूक, दारु, जुगार, बिनदिक्कत सर्रासपणे सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे.फैजपुर शहरातील सुरू असलेले हे  संपूर्ण अवैध धंद्यांना त्वरित बंद करून आळा न घातल्यास  फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा फैजपूर चे सहायक पोलीस निरीक्षक यांना फैजपूर मुस्लिम समाज मंचच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. मुस्लिम समाज मंचने दिलेल्या या

निवेदनात म्हटले आहे की, फैजपूर शहर रावेर, यावल, तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी एक ऐतिहासिक व महत्त्वाचा शहर आहे. 'शांतताप्रिय शहर' अशी ओळख असलेल्या या शहरात अवैध धंदे सर्रासपणे असल्याने फैजपूर शहरात गुन्हेगारीतही प्रचंड वाढ झाली आहे.

फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सुरू  असलेले अवेद्य धंदे जशे गोवंश मास विक्री व रेती माती, खर्वा, डबर, स्टटा पत्ता (जुगार) लॉटरी, हॉटेल धाब्या वर दारू ताडीची विनापरवाना विक्री तसेच मास  विक्री, गुटखा व शासन मान्य नसलेले सर्व अवेध धंदे तात्काळ बंद झाले पाहिजे तसेच वाटसअप, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मिडिया वर शहरातील काही टवाळ खोर जाणून बुजून धार्मिक भावना दुखवणे व जातिवाद करून शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. असे सर्व प्रकार बंद न झाल्यास आम्ही नागरिक SDPO फैजपूर पोलीस उप विभागिय कार्यलया समोर उपोषणला बसण्यार असल्याचे नमूद केले आहे या मागणी बाबतचे फैजपूर 

 शहरातील मुस्लिम समाज मंचच्या वतीने फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदन देताना अब्दुल रऊफ जनाब माजी नगरसेवक शेख जफर, माजी उपनगराध्यक्ष शेख कुरबान, अनवर खाटीक, रियाज मेंबर, आसिफ मेकॅनिक, याकुब खान, फीरोज सेठ, वसीम जनाब, मुदस्सर नज़र, सलिम उस्मान, मोहम्मद रियाज, जलील खान असलम खान शेख मोहसीन सह सर्व समाज मंच सदस्य उपस्थित होते.

No comments