क्रॉप कव्हरने केळी पिकांना दिले जातेय संरक्षण इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथे यंदाचा उन्हाळा मार्च महिन्यापास...
क्रॉप कव्हरने केळी पिकांना दिले जातेय संरक्षण
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी येथे यंदाचा उन्हाळा मार्च महिन्यापासूनच तीव्रपणे जाणवत आहे.एप्रिल महिन्यात तापमान ४५ अंशापर्यंत गेले आहे.यापासून सर्वच घटकांवर परिणाम दिसत आहे.अशा रखरखत्या उन्हात लावलेल्या आघात बागा सुकू नये यासाठी क्राफ्ट कव्हर द्वारे उन्हापासून संरक्षण देण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसून येत आहे. न्हावीसह मधुकर सहकारी साखर कारखाना परिसर, कळमोदा, बोरखेडा बुद्रुक, हंबर्डी ,मारुळ या परिसरातील शेतकरी आता दर्जेदार निर्यात क्षम केळी बागा तयार करत असल्याने साहजिकच उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. टिशू कल्चर रोपांची लागवड केल्यावर उन्हात रोप वाळू नये यासाठी क्रॉप कव्हर लावून पिकांना वाचवण्याची धडपड केळी पट्ट्यात बहुतांशी ठिकाणी दिसत आहे.यामुळे केळी भागांमध्ये केळी रोपांभवती कापडी आवरण लावल्याने संपूर्ण शेतात जणू केळी रोपांची सजावट केल्याच्या दृश्य पाहायला मिळत आहे.
No comments