adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

न्हावी प्र.यावल येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीच्या कामास सुरुवात ३० एप्रिल रोजी होणारे उपोषण आंदोलनाची माघार

  न्हावी प्र.यावल येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीच्या कामास सुरुवात ३० एप्रिल रोजी होणारे  उपोषण आंदोलनाची माघार  इदू पिंजारी फैजपू...

 न्हावी प्र.यावल येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीच्या कामास सुरुवात ३० एप्रिल रोजी होणारे  उपोषण आंदोलनाची माघार 


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 न्हावी प्र. यावल येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन व पाण्याच्या टाकीचे काम गेल्या  तीन वर्षापासून रखडले होते. त्या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने ३० एप्रिल रोजी उपोषणाचा इशारा दिला होता.मात्र दिनांक २९ एप्रिल रोजी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेले पाणीपुरवठा पाईपलाईन व उंच जलकुंभाच्या  टाकीचे तीन वर्षापासून रखडलेले कामास ठेकेदाराने  सुरुवात केल्याने संबंधित कामाबाबतचे उपोषण आंदोलन मागे घेण्यात येत आहे. जर संबंधित ठेकेदाराने यापुढे काम बंद किंवा कामात दिरंगाई केल्यास ग्रामपंचायत प्रशासन हे मुख्य कार्यकारी अधिकारी जि प जळगाव यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे बेमुदत आंदोलन करण्यात येईल  अशा आशयाचे पत्र नुकतेच ग्रामपंचायत प्रशासनाने  कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग जळगाव यांच्याकडे दिले आहे. त्यामुळे ३० एप्रिल रोजी  होणारे उपोषण आंदोलन माघार घेण्यात आले आहे.

        आमदार  अमोल  जावळे व माजी आमदार  शिरीष चौधरी,  प्रभाकर  सोनवणे माजी जि. प. सदस्य, युवा नेते  धनंजय  चौधरी व सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच चेतन  इंगळे, ग्रामपंचायत सदस्य शे. नदीम पिंजारी,  यशवंत  तळेले,  नितीन  इंगळे, रवींद्र  तायडे,  मयूर चौधरी, शेख  याकूब पिंजारी, सौ.आरजू तडवी, सौ. सविता  गाजरे, सौ. योगिता  इंगळे,सौ स्वीटी  बेंडाळे, सौ. रुपाली  तायडे, सौ.पौर्णिमा पाटील, सौ.फातेमा  तडवी, सौ.शोभा मोरे, सौ. हेमांगी  झोपे  यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आल्याने उपोषण मागे घेण्यात आले.न्हावी प्र.यावल च्या पाण्याच्या टाकीचे काम रखडले ठेकेदाराची मनमानी: भर उन्हाळ्यात ग्रामस्थ त्रस्त या शीर्षकाखाली या विषयाचे वृत्त दैनिकांत   प्रकाशित केले होते. आणि कामाला प्रत्यक्ष २९एप्रिल रोजी सुरुवात झाली.

No comments