adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावदा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

  सावदा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  सावदा तालुका रावेर येथील विनायक उर्फ ...

 सावदा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सावदा तालुका रावेर येथील विनायक उर्फ विकी मोनज पवार (वय २१) या तरुणाने दिनांक २५ एप्रिल रोजी मस्कावद रस्त्यावरील भोईवाडा भागातील रहीवासी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. या धक्कादायक घटनेमुळे 

सावदा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे 

 आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले ले नाही.सावदा शहरातील भोईवाडा भागात विकी पवार हा आपली आई, विवाहित बहीण आणि लहान भावासह रहवासात होता. फैजपूर रोडवर त्याचे 'पवार ॲक्वा' नावाचे दुकान असून शुक्रवारी दुपारी त्याने घराच्या छताच्या कडीला दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना वार्ता कळताच परिसरात खळबळ उडाली 

स्थानिक रहिवाशांनी सावदा पोलिसांना घटनेची माहिती दिली. सावदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक फौजदार संजय देवरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत

No comments