adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

काश्मीर मधील अतिरेकी हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून तीव्र निषेध,अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून दहन

  काश्मीर मधील अतिरेकी हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून तीव्र निषेध,अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून दहन  सचिन मोकळं अहिल्य...

 काश्मीर मधील अतिरेकी हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून तीव्र निषेध,अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून दहन 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२३):- काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध करत अहिल्यानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काश्मीर येथील पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर,अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले.या वेळी "मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद,बदला घ्या बदला घ्या हिंदूंवरील हल्ल्याचा बदला घ्या" अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.या आंदोलनात प्रा.माणिक विधाते,माजी नगरसेवक विपुल शेटिया,अजिंक्य बोरकर,प्रकाश भागानगरे,सुरेश बनसोडे,वैभव ढाकणे,गुड्डू खताळ,अजय दिघे,युवराज शिंदे,संजय मोरे, सागर गुंजाळ,संपत बेरड,मयूर कुलथे,ऋषिकेश ताठे,अमित खामकर,दीपक निपाणी,बाली बांगरे,सचिन पवार,साधना बोरुडे,अरविंद शिंदे,अभिजीत खोसे,संजय सपकाळ इ. कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.हल्लेखोरांना कठोर शिक्षा मिळावी आणि अशा घटनांना आळा बसावा,ही सर्वांची एकमुखी मागणी आहे. देशातील शांतता,एकात्मता आणि सुरक्षिततेसाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहणे हीच काळाची गरज आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच देशहितासाठी ठाम भूमिका घेत राहील असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी केले.

No comments