adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे शुभेच्छा

  इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे शुभेच्छा  यावल प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) यावल : एकात्मिक आदिवास...

 इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे शुभेच्छा 


यावल प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

यावल : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या 52 शासकीय व अनुदानित शाळांच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या शिक्षकांना जिल्हाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून,सदर सहलीचे विवरण व अनुभव पत्राद्वारे कळवावा,अशी अपेक्षा व्यक्त केली.ही निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रत्येक वयोगटातून प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या उपक्रमांच्या सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून करण्यात आली.असे एकूण 18 विद्यार्थी आणि 6 शिक्षक-कर्मचारी या सहलीसाठी रवाना होत आहेत.विद्यार्थी प्रस्थान करताना रेल्वेने प्रवास करणार असून,परतीचा प्रवास विमानाने करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रवासाचा अनुभव घेता येईल.या सहलीत विद्यार्थ्यांना इस्रो,अहमदाबाद येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरला भेट देण्याची संधी मिळणार आहे. तसेच,ते सायन्स सिटीला भेट देऊन तेथील एक्वेरियम,रोबोटिक्स,आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर वैज्ञानिक विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घेणार आहेत.

प्रकल्प अधिकाऱ्यांचा मानस

विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात,त्यांची जिज्ञासा वाढावी आणि भविष्यात या क्षेत्रात ते स्वतःला सिद्ध करावेत,हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.अशा शैक्षणिक सहलींमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकात वाचलेले ज्ञानच नव्हे,तर प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.भविष्यात देखील अशा प्रकारच्या उपक्रमांना चालना देण्यात येईल,असा विश्वास माननीय प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी व्यक्त केला.

सदर सहलीचे नियोजन शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील,आर.एम.लावणे आणि संदीप पाटील यांनी परिश्रमपूर्वक केले.त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना ही अनमोल संधी मिळाली आहे. सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल

No comments