केळी खाल्ल्याने शरीराला अनेक पोषण तत्वे मिळतात - शरद महाजन इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) केळी खाणे हे शरीर स्वास्थ...
केळी खाल्ल्याने शरीराला अनेक पोषण तत्वे मिळतात - शरद महाजन
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
केळी खाणे हे शरीर स्वास्थ्यासाठी खूपच उपयुक्त असून त्यापासून शरीराला अनेक पोषण तत्त्वे मिळत असतात. केळी दिनाच्या निमित्ताने केळी खाणे याबद्दलची जागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने दररोज एक जरी केळ खाल्लं तरी केळीला चांगली स्थानिक बाजारपेठ मिळू शकते. जेणेकरून केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळेल.सध्या केळी उत्पादकांचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे असे प्रतिपादन जे टी महाजन को आप फ्रुटसेल सोसायटी न्हावी चे चेअरमन शरद महाजन यांनी केले.
जे टी महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीच्या आवारामध्ये केळी दिनानिमित्त संस्थेचे व्हॉचेअरमन भोजराज बोरोले यांच्या हस्ते केळीच्या घडाचे पूजन करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे चेअरमन शरद महाजन, संचालक सुभाष भंगाळे, ज्ञानदेव चोपडे, नरेंद्र महाजन,मिलिंद भोगे, गिरीश गाजरे, संजय. महाजन ,दिलीप गाजरे, सदाशिव फिरके, लक्ष्मण इंगळे, भूषण महाजन, प्रवीण चोपडे, कांतीलाल तायडे, सुधाकर पाटील, धीरज वाघुळदे, मॅनेजर किरण पाटील सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

No comments