रावेर नगरीत भगवान महावीर जयंती जल्लोषात साजरी रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भगवान महावीर जयंती मोठ्या थाटा...
रावेर नगरीत भगवान महावीर जयंती जल्लोषात साजरी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भगवान महावीर जयंती मोठ्या थाटात जल्लोषात साजरी करण्यात आली सर्वप्रथम सकाळी ७:३० ते ८:३० वाजता १००८ श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर रावेर मध्ये भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे अभिषेक व पूजन करण्यात आले.त्यानंतर मंदिरापासून,मेनरोड,भाजीमार्केट,रथगल्ली,गांधीचौक,अफुगल्ली, डॉ हेडगेवार चौक यामार्गे भगवंताची पालकी ची डी.जे सह भव्य शोभा यात्रा संपन्न झाली.
त्यानंतर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पद्माकर महाजन, दिलीप पाटील, मनोज श्रावक, डी.डी वाणी,यांचे तसेच भारतीय जैन संघटनेचे तालुका कार्यकारिणी मंडळ यांचे अभिनंदन व स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या मध्यंतरी रावेर चे लोकप्रिय आमदार अमोल जावळे यांचा भ्रमणध्वनीवर आलेला शुभेच्छा संदेश ऐकविण्यात आला.समाजाचे अध्यक्ष उज्ज्वल डेरेकर ,उपाध्यक्ष कैलास सैतवाल यांनी इंद्र महाराज बनून अभिषेक पूजन ची जबाबदारी पार पाडली तसेच राजकुमार जैन यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक केले.सदरील कार्यक्रमाला रावेर व परिसरातील संपूर्ण जैन समाज मोठ्या आनंदात व उत्साहात उपस्थित होते.तसेच संध्याकाळी भगवंताच्या पाळण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.अशा प्रकारे कार्यक्रम साजरा झाला...


No comments