adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पर्यावरण जागृतीसाठी कर्मचाऱ्याचा पुढाकार बऱ्हाणपूर ते यावल सायकलवारीतून प्रबोधन

  पर्यावरण जागृतीसाठी कर्मचाऱ्याचा पुढाकार बऱ्हाणपूर ते यावल सायकलवारीतून प्रबोधन    शब्बीर खान यावल प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड)   प्...

 पर्यावरण जागृतीसाठी कर्मचाऱ्याचा पुढाकार बऱ्हाणपूर ते यावल सायकलवारीतून प्रबोधन 


 शब्बीर खान यावल प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

 प्रकाश मराठे हे पर्यावरण  संरक्षणाचा संदेश देत बऱ्हाणपूर शहरातील ६९ वर्षीय वृद्धाने सायकलीने यावल शहर गाठून श्री महर्षी व्यासांचे दर्शन घेतले. आपण वन विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होतो. सेवानिवृत्तीनंतर वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण किती महत्त्वाचे आहे हे नागरिकांना पटवून देण्यासाठी ६५ किमी सायकल चालवून श्री व्यासांच्या दर्शनासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. शहरात मनसेने त्यांचे स्वागत केले.

बऱ्हाणपूर येथील रहिवासी तथा वन विभागातील निवृत्त कर्मचारी

संरक्षणासाठी सातत्याने जनजागृती आहे. शुक्रवारी यानी बहऱ्हाणपूर ते यावल असा ६५ किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलीने पूर्ण केला. या प्रवासात गावोगावी पर्यावरण संरक्षण, प्रदूषणमुक्त परिसर, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन किती गरजेचे आहे? यावर जनजागृती केली. ते बऱ्हाणपूर येथून पहाटे पाच वाजता निघाले. यावल येथील महर्षी व्यास मंदिरात ११ वाजता पोहोचले. मनसेचे जनहित विभाग राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर, प्रमोद कोलते, किशोर नन्नवरे, विलास चौधरी आदींनी त्यांचे स्वागत केले. व्यास मंदिरात सुद्धा त्यांनी संवाद साधला.

No comments