11 मे ला आसेमं सामुहिक विवाह सोहळा नव वधूवरांनी विवाह नोंदणी करावी अविरत 28 वे वर्ष सावदा प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी (संपादक -:- हेमक...
11 मे ला आसेमं सामुहिक विवाह सोहळा नव वधूवरांनी विवाह नोंदणी करावी
अविरत 28 वे वर्ष
सावदा प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यंदाही 11मे 2025 रोजी आसेमं आदिवासी तडवी भिल सामुहिक विवाह सोहळा पार पडणार आहे या तडवी भील सामुहिक विवाह सोहळ्यात आजतागायत 1830 जोडपी विवाहबद्ध झाली असून संस्थेच्या वतीने वधूवरांना लग्नाच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या आहेत सलग 27वर्ष अविरत यशस्वी होत (2 वर्ष कोरोना काळ सोडून) 28वा सामुहिक विवाह सोहळा सावदा तालुका रावेर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे महाराष्ट्र भरातातील आदिवासी समाजातील नववधु वरांचे शुभविवाह या मंगल परिणय लग्न सोहळ्यात पंचक्रोशीतील हजारो समाज बांधवांच्या हजेरीत मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात येतात आसेमं आदिवासी सेवा मंडळ दानशूर दाते समाजासह ईतर सर्व शुभचिंतक हितचिंतकांनी केलेली मदत सहकार्याने नववधु वरांचे कडून काही एक अपेक्षा वर्गणी देणगी पावती पैसे न घेता जो दे उसका भी भला जो ना दे उसका भी भला या उक्तीप्रमाणे वधूवरांना संस्थेच्या वतीने कपडे संसारोपयोगी वस्तू भांडी देऊन सामाजिक ऋण फेडण्यासाठी आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना प्रयत्नशील आहे तरी आदिवासी समाज बांधवांनी इच्छुक वधूवर यांनी
दि.11 मे 2025 रविवार रोजी संपन्न होणार असलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह नोंदणी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष
राजू बिर्हाम तडवी
इरफान सत्तार तडवी
अनिल नजीर तडवी
मुबारक अली तडवी
बिराज बाबू तडवी
रईस तडवी पो पा यांचेशी
9860566609
या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजक आसेमं" आदिवासी सेवा मंडळ सावदा च्या वतीने करण्यात आले आहे

No comments