फैजपूरच्या शिव कॉलनीत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) शिवकालनीतील नुकत्याच स्थ...
फैजपूरच्या शिव कॉलनीत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
शिवकालनीतील नुकत्याच स्थापन केलेल्या संविधान युवक क्रांती मंडळाने सल्लागार समितीने आयोजित केलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती शिवकालनी फैजपूर येथे साजरी करण्यात आली. दिनांक १२/५/२०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता शिवकालनी फैजपूर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सुरवातीला त्रिशरण , पंचशील व भिमस्तुती करून वंदना केली बौद्धाचार्य बी.डी महाले सर व सहाय्यक विष्णू मेश्राम यांनी वरील प्रमाणे वंदना करुन सर्वानकरवी तथागतांन भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन केले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक आगळे सर व वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा ताई पाटील यांनी अतिशय मार्मिक उद्बोधक, अनमोल असे बुद्ध विचार व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यावर भाष्य करुन समाजात एकोपा निर्माण व्हावा बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे प्रत्येकाने आचरण करून मैत्री भावना निर्माण करावी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लीखीत भारतीय संविधानाचे अनेक आर्टिकल समजावून सांगितले. शेवटी सर्वानी पवित्र अशा खिरदानाचा प्रसादाचा लाभ घेतला. दिनांक १३/५/२०२५ रोजी बौद्ध जयंती निमित्त मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला सदर अन्नदानाचा आस्वाद जवळ जवळ १५०० ते १७०० लोकांनी लाभ घेतला. बौद्धाचार्य बी.डी महाले व विष्णू मेश्राम यांनी वरील प्रमाणे बुद्ध वंदना घेउन मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला फैजपूर येथील खंडोबा देवस्थानचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर पवनदासजी महाराज यांनी हजर होऊन शुभेच्छा व आशिर्वाद दिला.या कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी धिरज मेंढे, लखन इंगळे नितीन इंगळे, महेश पारधे ,बबलू मनुरे व जेष्ठ सल्लागार अशोकजी भालेराव साहेब सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वामी विजयानंद यांनी अथक परिश्रम करून बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला अँड.शामभाऊ इंगळे, उदय अप्पा चौधरी,उप प्राचार्य डी.आर.तायडे, प्रा विजय तायडे, प्रा.संदानशिव सर, सेवानिवृत्त पी एस.आय लोखंडे साहेब. यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच शिवकालनीतील ईश्वरभाऊ इंगळे, देवा साळी जय हरी टेंन्टचे मालक, तसेच तळेले सर सेवानिवृत्त, शैलेंद्र अवसरमल, सहाय्यक पोलीस बबन भालेराव, संजय मेढे, संदीप मेढे, दिलीप आढाळे राहुल उर्फ सुपा इंगळे, विनोद तायडे, भुषण मेढे, पीन्टु इंगळे, छोटु इंगळे सुशील तायडे, संदीप जगदेव मेंढे, बबन तायडे, देविदास साळुंके निळकंठ भालेराव, बाळु भालेराव, योगेश केदारे यांचे सहकार्य लाभले, तसेच महिला कल्पना पोहेकर, सुमित्रा इंगळे, लता सदानंद मेढे, कोकीळा मेढे, प्रतीभा पारधे, रत्नमाला इंगळे , अनीता इंगळे, आशा इंगळे, निर्मला अवसरमल, प्रतीमा भालेराव, अलका मेढे, ज्योती भालेराव माया तायडे, लता तायडे, सुनीता आढाळे, निर्मला खंडाळे, सरीता भालेराव, इंद्रायणी भालेराव, मोठ्या संखेने महिला व पुरुष यांनी सहभाग घेऊन बुद्ध जयंती अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरी केली.उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे हस्ते पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले , अशोकजी भालेराव साहेब यांनी प्रास्ताविक व शेवटी आभार सुध्दा मांडले.

No comments