adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

‘तिरंगा वीर स्मरण यात्रा’ ला फैजपूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

 ‘तिरंगा वीर स्मरण यात्रा’ ला फैजपूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा ग्रामिण...

 ‘तिरंगा वीर स्मरण यात्रा’ ला फैजपूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद



रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्हा ग्रामिण काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘तिरंगा वीर स्मरण यात्रा’ ला फैजपूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.देशभक्तीचा संदेश देणारी ही यात्रा ध.ना.महाविद्यालय फैजपूर 'प्रेरणास्तंभ' येथून सुरु होऊन 'स्वातंत्र्य स्मारक' पर्यंत काढण्यात आली.

      यात्रेच्या माध्यमातून २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेनेने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तराचा गौरव करण्यात आला.या कारवाईत भारतीय सेनेने शेकडो अतिरेक्यांचा खात्मा केला.या भारतीय सेनेच्या अभ्यासपूर्ण मोहिमेमुळे पाकिस्तान हा अतिरेक्यांचा आश्रयदाता देश असल्याचे पुन्हा एकदा जगासमोर स्पष्ट झाले.

    यात्रेदरम्यान हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या बलिदानाचा सन्मान करत उपस्थितांनी एक मिनिट मौन पाळले.

   यावेळी देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

  कार्यक्रमात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार,रावेर-यावलचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी,युवानेते धनंजय चौधरी,प्रभाकरअप्पा सोनवणे,डॉ.राजेंद्र पाटील,लिलाधशेठ चौधरी,शेखर पाटील,संजू जमादार,राजू सवरने,हरिश गनवाणी,जावेद जनाब,बापू पाटील,जिजाबराव चौधरी,हयात शेठ,डॉ.सुरेश चौधरी,आशुतोष पवार,रियाज शेख,केतन किरंग,कलिम मेंबर,देवेंद्र बेंडाळे,अय्युब मेंबर,भुपेंद्र जाधव,अनिल जंजाळे,डॉ.दानिश शेख,वसीम तडवी,योगेश भावसार,वसीम जनाब,ज्ञानेश्वर कोळी,भागवत सुर्यवंशी, सुनिल पाटील,संजीव सोनवणे, नंदकिशोर सांगाळे,भरत पाटील,दिनेश पाटील,पुरुषोत्तम पाटील,रविंद निकम, शैलेश बोडदे, संजय पाटील,शरद पाटील,देविदास पाटील,उद्धव वाणी,जगदीश गाढे, प्रदीप सोनवणे,मनोहर महाले, गोविंद देशमुख,एजाज सर,रामदास लहासे,ज्ञानेश्वर बऱ्हाटे,पिरन तडवी,हमीद शेठ,विठ्ठल चौधरी,नदीम पिंजारी,भरत चौधरी,नईम शेख,भरत चौधरी,मनोहर चौधरी,कबीर मेंबर, कबीर मोमीन मेंबर,उमर कच्छी,हाकीम शेठ,अक्कउल्ला शेठ,आसिफ मेकॅनिक,अप्पा चौधरी,गयास शेख,यशवंत धनके,संतोष पाटील,सउद शेख,साजिद मेंबर,सफिक कच्छी,हानिफ पेहलवान,इकलास सय्यद,गुरव सर

व काँग्रेसचे पदधिकारी,नागरिक व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते....

No comments