adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथे सहायक निबंधक कार्यालय सामोरील शिवसेना शिंदे गटाचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे

  यावल येथे सहायक निबंधक कार्यालय सामोरील शिवसेना शिंदे गटाचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे शब्बीर खान यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल...

 यावल येथे सहायक निबंधक कार्यालय सामोरील शिवसेना शिंदे गटाचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे



शब्बीर खान यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात सहाय्यक निबंध सहकारी संस्था कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोर बुधवारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. दरम्यान दुपारीच त्यांचे हे उपोषण लेखी आश्वासन पत्र दिल्यानंतर मागे घेण्यात आले आहे. 

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय आहे. या कार्यालयाकडे शिवसेना शिंदे गट चे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी पत्र देऊन कालिका पतसंस्थेचे चेअरमन यांच्या विरुद्ध तक्रारी केल्या होत्या. त्यास प्रमाणे सदर कार्यालयाकडे अनेक प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत. ज्यांचा न्यायनिर्वाळा अद्याप झालेला नाही. तसेच लेखा परीक्षण प्राप्त झाल्यानंतर देखील काही जण दोषीं आडळले आहे. तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी त्यांची मागणी होती. मात्र, कार्यालयाकडून त्यांच्या तक्रारीवर कार्यवाही झाली नाही म्हणुन त्यांनी बुधवार दिनांक २१ मे रोजी उपोषण सुरू केले होते. मात्र, कार्यालयाच्या प्रतिनिधींनी त्यांना लेखी पत्र देत आपल्या मागण्या या लवकरच मान्य केल्या जातील असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे.

No comments