adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डोंगर उतारावरील पायवाट बनली त्रासदायक; दावल मलिक बाबा देवस्थान रस्त्यासाठी पुण्यातील कार्यकर्त्याची मागणी

  डोंगर उतारावरील पायवाट बनली त्रासदायक; दावल मलिक बाबा देवस्थान रस्त्यासाठी पुण्यातील कार्यकर्त्याची मागणी मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवा...

 डोंगर उतारावरील पायवाट बनली त्रासदायक; दावल मलिक बाबा देवस्थान रस्त्यासाठी पुण्यातील कार्यकर्त्याची मागणी


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे डोंगरावर वसलेल्या दावल मलिक बाबा देवस्थानात राज्यभरातून येणाऱ्या लाखो हिंदू-मुस्लीम भाविकांना जाण्यासाठी अद्यापही पक्का रस्ता उपलब्ध नाही. पायवाटेच्या मार्गावरून चढाई करताना आणि खाली उतरताना नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळास पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन रस्ता तातडीने बनवावा, अशी मागणी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जयेश घुगे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दावल मलिक बाबा यांचा दर्गा बागलाण तालुक्यातील अंतापूर गावाजवळील डोंगरावर आहे. गुरुवारी आणि सणासुदीच्या दिवशी येथे हजारो भाविक येत असतात. नवसपूर्तीसाठी शेकडो पालख्या वर्षभर येथे दाखल होतात. हिंदू आणि मुस्लिम समाजाचे हे श्रद्धास्थान असतानाही येथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

जयेश घुगे यांनी गेल्या काही वर्षांपासून या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात, "खाली उतरताना नागरिकांना अपघाताचा धोका असतो. त्यामुळे डोंगर उतारावरील रस्त्याची पाहणी करून सुरक्षित व पक्का रस्ता तातडीने तयार करावा. तसेच देवस्थानास पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा," अशी मागणी केली आहे.

यासंदर्भात मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्यात आला असला तरी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यटन विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने कार्यवाही लांबणीवर पडत आहे. देवस्थानाचा परिसर वनविभागाच्या अखत्यारीत असल्याने विकासकामांना अडथळे येत असल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भाविकांनी तसेच स्थानिकांनी आमदार, खासदारांनी यात लक्ष घालून जनतेच्या भावना ओळखून रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे.

No comments