adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खानदेश संपर्क प्रमुख पदी सागर शेलार यांची निवड

  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खानदेश संपर्क प्रमुख पदी सागर शेलार यांची निवड  कासोदा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कासोदा -:...

 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खानदेश संपर्क प्रमुख पदी सागर शेलार यांची निवड 


कासोदा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कासोदा -:- येथील युवा पत्रकार सागर शेलार यांना दि.४ में रोजी पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा पाचोरा यांच्या आयोजित कार्यक्रमात युवा पत्रकार सागर शेलार यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खानदेश जळगाव , धुळे, नंदुरबार, नाशिक संपर्क प्रमुख पदी नियुक्त केल्याचे खासदार स्मिताताई वाघ , आमदार किशोर पाटील , मा.आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन शेलार यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्यात. 


 त्याप्रसंगी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ , पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील , मा. आमदार दिलीप वाघ, राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने , कार्याध्यक्ष अबरार मिर्झा , उपाध्यक्ष राकेश सुतार , ॲड. वासुदेव वारे , घनश्याम पांडे  , शैलेश पांडे, योगेश चौधरी , समाधान पाटील , चेतन महाजन आदी पदाधिकारी व सदस्य उपास्थित होते.

शेलार हे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजकार्य करीत असल्याने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे , राज्य संघटक संजय भोकरे , राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे , राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने यांच्या आदेशान्वये झाली आहे. शेलार हे भ्रष्टचार निवारण समितीचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष , खानदेश विभागीय उपाध्यक्ष व आता त्यांची संघाच्या खानदेश संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. सागर शेलार यांच्या निवडीबद्दल त्यांचे राजकीय व सामाजिक  क्षेत्रातून कौतुक व अभिनंदन होत आहेत.

No comments