यावल शहर शिवसेना (ठाकरे गट) च्या वतीने नगरपालिकेस विविध मागण्यासाठी निवेदन यावल नगरपालिकेत संबंधित अधिकाऱ्यांना शिवसेनेतर्फे विविध मागण्...
यावल शहर शिवसेना (ठाकरे गट) च्या वतीने नगरपालिकेस विविध मागण्यासाठी निवेदन
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पिण्याचे पाणी,नाले गटारी सफाई तसेच,बोरावल गेट ते भुसावळ रोड डांबरी करण्यासाठी संदर्भात दिले निवेदन
यावल शहर शिवसेना शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज यावल न पा कार्यालय प्रमुख श्री गावडे साहेब यांना निवेदन देण्यात आले व त्यांचेशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर निवेदनात यावल शहरात होत असलेला पाणी पुरवठा दुर्गंधी युक्त,पिवळसर,अशुद्ध होत असले बद्दल तसेच यावल शहरातील पावसाळा पूर्व नाले गटारी सफाई करणे बाबत व बोरावल गेट ते भुसावळ रोड पर्यंतचा रस्ता नूतनी करण डांबरी करणे बाबत विषय नमूद करण्यात आलेला आहे.
निवेदनात म्हटले आहे की यावल शहरात होत असलेला पाणीपुरवठा हा दुर्गंधी युक्त पिवळसर अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होवून विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात.पाण्यात शुद्धी करण्यासाठी ब्लिचिंग पावडर चे प्रमाण अत्यल्प नित्कृष्ट दर्जाची वापरली जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तरी तातडीने शुद्ध स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा.
पावसाळ्या पूर्वी यावल शहरातील बेहेडे सूपर शॉप ते बोरावल गेट,बुरुज चौक ते बस स्टैंड,टी पॉइंट ते भुसावळ रोड त्याच प्रमाणे शहरातील विविध भागातीलगटारी व नाल्यातील गाळ उपसा सफाई करण्यात यावी.पावसाळ्यात पाणी गटारीत तुंबल्याने गटारीतील घाण कचरा रस्त्यावर येवून दुर्गंधी पसरते तर सखल भागात घरे दुकान यांत हे पाणी कचऱ्यासह जाण्याची शक्यता नाकारतां येत नाही त्यामुळे आजारपण येवून आरोग्यास अपाय होऊ शकतो तरी पावसाळ्या पूर्वी सर्वत्र सफाई करण्यात यावी.
बोरावल गेट ते भुसावळ रोड नाका पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून एकेरी मार्गावर वाहतूक सुरू आहे.रस्त्याच्या एका बाजूस पाणी पुरवठ्याचा एयर व्हॉल्व असून त्यातील पाणी पूर्णतः रस्त्यावर वाहत असून त्यामुळे एकेरी मार्गावर वाहतूक सुरु आहे तर एक बाजू बंद आहे.तरी सदरील व्हॉल्व मधील वाहणारे पाणी योग्य पद्धतीने साईडने निचरा करून रोडावर येणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.वरील सर्व कामे तातडीने व गांभीर्याने सोडविण्यात यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देताना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,शरद कोळी,संतोष धोबी,पप्पू जोशी,योगेश चौधरी,योगेश राजपूत पाटील,प्रकाश वाघ,हुसेन तडवी,विजू कुंभार,पिंटू कुंभार,अजहर खाटीक,प्रवीण लोणारी,सुनील बारी,आदी शिवसैनिक उपस्थित होते.

No comments