adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रावण बाळ, वृद्धपकाळ योजना व इतर शासकीय योजना यांचे केयवायसी गावातील सेतू केंद्रात व्हावी ग्रामस्थांची मागणी

  श्रावण बाळ, वृद्धपकाळ योजना व इतर शासकीय योजना यांचे केयवायसी गावातील सेतू केंद्रात व्हावी ग्रामस्थांची मागणी  किरण पाटील अंतुर्ली (संपादक...

 श्रावण बाळ, वृद्धपकाळ योजना व इतर शासकीय योजना यांचे केयवायसी गावातील सेतू केंद्रात व्हावी ग्रामस्थांची मागणी 


किरण पाटील अंतुर्ली

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अंतुर्ली ता. मुक्ताईनगर.श्रावण बाळ, वृद्धपकाळ योजना व इतर शासकीय योजना यांचे केयवायसी गावातील सेतू केंद्रात व्हावी अशी मागणी.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (VJNT) विभागाचे प्रदेश सचिव अनिल वडिले, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष नामदेव राव भोई, अंतुर्ली शहर काँग्रेस अध्यक्ष शे. भैय्या शे. करीम,ता.सेवा दल अध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण धायले,व कार्यकर्यांनी केली आहे. श्रावण बाळ, वृद्धपकाळ योजना व इतर शासकीय योजना यांचे केवायसी करण्यासाठी तहसील कार्यालयात वयवृध महिला, पुरुष यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन येजा करावी लागते.ही वयरुद्ध मंडळी 65.वर्षाच्या वर असल्याने त्यांना त्यांचे चालणे अवघड होहून जाते. ते बँकेत त्यांचे पैसे काढण्यासाठी चार पाच ठिकाणी उठत- बसत बँकेत जातात व पैसे काढतात अशी दयनीय अवस्था आहे.तहसील कार्यालयात तालुका भरातून सर्वच मंडळी केव्हायसी करण्यासाठी जमा होतात गर्दी होते व नाहक त्रास सहन करावा लागतो व प्रशासकीय कामात व्यतय निर्माण झाल्याने सर्वसामान्य जनतेची कामे खोळबली जातात. त्यामुळे वेळ व पैसा खर्च होतो.सध्या तापमान खुप असल्यामुळे उन्हातहानात भुकेले तान्हेलं राहून ही म्हातारी मंडळी केवायसी करतात कधी -कधी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुद्धा जावे लागते,,मनस्ताप होतो,प्रवास करून घरी आल्यावर काही वृद्ध मंडळी आजारी पडतात. तरी या सर्व बाबींचा विचार करून वय वृद्ध मंडळीस दिलासा द्यावा *व सर्व शासकीय योजनाचे केवायसी गरजू लाभार्त्यांच्या गावाजवळील सेतू सुविधा केंद्रावर व्हावी *असे आदेश द्यावे अशी विनंती आहे.

No comments