बहावा च्या झाडापासून होणारे फायदे खलील तडवी बिडगाव संपादक हेमकांत गायकवाड बहावा हे निसर्गातील अतिशय सुंदर वृक्ष आहे उन्हाळ्यामध्ये रस्...
बहावा च्या झाडापासून होणारे फायदे
खलील तडवी बिडगाव
संपादक हेमकांत गायकवाड
बहावा हे निसर्गातील अतिशय सुंदर वृक्ष आहे उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर दिसणारा हा वृक्ष मला कायमच भुरळ घालतो संस्कृत मध्ये या वृक्षाला आर आरग्वध'असे म्हणतात तर हे झाड हिंदीमध्ये अमलतास या नावाने ओळखले जाते रखरखत्या उन्हात पाहणा-याला अगदी वेळ लागेल अशा पिवळ्या धंम रंगामुळे या वृक्षाला गोल्डन शावर ट्री'या नावाने देखील ओळखले जाते हे वृक्ष साधारणत:२५ते३०फुट वाढते हिवाळ्यात या वृक्षाची पानगळ होऊन संपूर्ण झाडावर फक्त नळीदार काळ्या शेंगा दिसतात.उन्हाळयात या वृक्षाचे सौंदर्य बघण्यासारखे असते याला झुपकेदार खालीलोमणारे फुलोरे येतात कानात घालणारे अलंकार सुद्धा झूपकेदार असल्याने या वृक्षाला "करणीकार या नावाने देखील ओळखले जाते आमवात मध्ये अतिशय गुणकारी आहे यासह संधिवात, पित्तप्रकोप, हृदयरोग, उदरशूळ, गर्भपातन, पक्षाघात, यामध्ये या वृक्षाची पाने, फुले, फळे, बिया, मूळ सारे काही उपयुक्त आहे सातपुडा व मेळघाटात या वृक्षांची फुले सुकवून त्याच्या मुरब्बा केला जातो हा मुरब्बा दोन-तीन वर्ष टिकतो तसेच बहाव्याचे लाकूड देखील अतिशय मजबूत आणि चांगल्या दर्जाचे असते.ह्याचया लाकडाचा बैलगाड्या, होड्या, शेती अवजारे, शोभेच्या वस्तू मूर्ती बनवण्यासाठी त्याच्या वापर केला जातो तर असा हा उन्हाळ्यात दिसणारा बहावा तुम्हाला देखील दिसला तर तुम्ही फोटो काढल्याशिवाय राहू शकणार नाही

No comments