खिर्डी येथे तरुणांकडून दोन गावठी कट्टे जप्त. निंभोरा पोलिसांची धडक कारवाई रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खिर्...
खिर्डी येथे तरुणांकडून दोन गावठी कट्टे जप्त.
निंभोरा पोलिसांची धडक कारवाई
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खिर्डी येथे एक संशयित गावठी कट्टा बाळगत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दिनांक १८ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास निंभोरा यांनी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की खिर्डी खुर्द शिवारात निळकंठ पुंडलिक बढे यांचे शेत गट क्रमांक ३४९ मध्ये एका घराचे शेजारी एक इसम दहशत माजवण्याच्या इराद्याने अवैधरित्या गावठी पिस्तूल स्वतःचे कब्जात बाळगून आहे यावरून तसेच पोलीस उपनिरीक्षक ढाकणे सोबत पोलीस स्टाफसह मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करणे कामी घटनास्थळी जाऊन पाहिले असता
तेथे एक इसम संशयित हालचाली करताना दिसून आल्याने त्यास रात्री ११:३० वाजता जागीच पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये दोन गावठी पिस्तूल,( मॅक्झिनसह) मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिल रामलाल बारेला राहणार खिर्डी तालुका रावेर असे सांगितले असून त्यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणून पुढील कारवाई करून गुन्हा नोंद केला आहे.या प्रसंगी निंभोरा पोलिस स्टेशन चे सपोनी हरिदास बोचरे व उपनिरीक्षक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक पोलीस हवालदार योगेश चौधरी, पोलीस नाईक सुरेश पवार, पोलीस शिपाई अमोल वाघ, पोलीस शिपाई सरफराज तडवी, पोलीस शिपाई रशीद तडवी, पोलीस शिपाई, प्रभाकर ढसाळ, पोलिस शिपाई रशिद तडवी,यांनी ही कामगिरी केली आहे


No comments