सावदा पोलिसांनी केली ३० उंटांची सुटका! ९ उंट सह ट्रक जप्त ३ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल" १६ मे ते २७मे दरम्यान ३० उंटाचे वाचविल...
सावदा पोलिसांनी केली ३० उंटांची सुटका! ९ उंट सह ट्रक जप्त ३ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल"
१६ मे ते २७मे दरम्यान ३० उंटाचे वाचविले प्राण
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा पोलीसांनी मिळालेल्या माहितीनुसार सपोनि विशाल पाटील यांच्या पथकाने दि.२४ मे २०२५ रोजी सकाळी ३ वाजेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया सावदा ता.रावेर जवळ वाहन क्रं.आर.जे.०९ जीई ९६९० याला अडवून चौकशी केली असता या मध्ये ९ उंट जातीचे प्राणी यांना प्रवासात वेदना होतील अशा पध्दतीने मिळून आले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,सदर वाहनात उंट जातीच्या प्रत्येक प्राण्याला स्वतंत्र असे चारी पायाला एक जागी पैक बांधुन व त्यांच्या गळयाला दोरीने अतिशय निर्दयीतेने बांधुन ती दोरी टेम्पोचे हुकाला आवळुन बांधुन खाली बसवुन,त्या उंटांना सदर वाहनात बसण्याची पुरेशी जागा व गाडीची उंची त्याप्रमाणात नसताना त्यांना बळजबरीने या वाहनात कोंबुन भरुन अत्यंत दाटीवाटीने बांधुन या सर्व प्राण्यासाठी सदर वाहनात कोणत्याही प्रकारचा चारा,अन्न अगर पाणी याची सोय न करता प्राण्याचा छळ करुन प्राण्याबाबतची काळजी व संरक्षणाची वाजवी कोणतीही सोय नसल्याची स्थिती आढळून आली.परिणामी याबाबत आरोपीत नामे१.सलमानखान हकिम खान, वय-२४,रा.टेसुर ता.जि.धार (मध्य प्रदेश),२.धरमेंद्र बाबुलाल चंदेला,वय-४२,रा.संमेरत्रा ता.बदनापुर जि.धार(मध्ये प्रदेश),३.क्लीनर आसिक अली अयुब अली,वय-३६ रा.आवर ता.पचपाळ जि.जलावर(मध्यप्रदेश)असे उंटांची वाहतुक करताना मिळुन आल्याने,सदर प्रकरणी पोलीस नाईक सुनील नारायण सौदाणे यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणेत आला असुन,तपास सपोनि विशाल पाटील यांचे आदेशाने सफौ.संजय देवरे करीत आहे.
अशाच प्रकारे दि.१६ मे २०२५ रोजी सुद्धा सावदा पोलीसांनी २१ उंटांची सुटका करून त्यांना जळगाव येथील गोशाळांमध्ये पाठवले असता येथे त्यांच्या खाद्यपदार्थ,पाणी आणि योग्य उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच १६ मे ते २७ मे पर्यंत सदरच्या कारवाईत सावदा पोलीसांनी एकूण ३० उंटांची सुटका केल्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
No comments