adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूर शहराच्या इतिहासात प्रथमच पोवाड्यांच्या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन

  मलकापूर शहराच्या इतिहासात प्रथमच पोवाड्यांच्या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर -:-...

 मलकापूर शहराच्या इतिहासात प्रथमच पोवाड्यांच्या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन 



अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर -:- महापुरूषांची जयंती म्हटलं म्हणजे डिजे लावून धांगडधिंगा असे स्वरूप आता सर्वत्र पाहायला मिळत आहे. मात्र याला मलकापूर शहर वासियांनी फाटा दिला असून आयोजन समितीत उच्चविभूषित सदस्य मात्र नाव कुठेही नाही. अशांकडून  शिवशंभूंच्या जयंतीनिमित्त पोवाड्यांचा कार्यक्रमाचे आयोजन व या कार्यक्रमात शहरातील सर्व जाती-धर्माचे नागरिकांनी भर पावसातही उत्सफूर्त प्रतिसाद देत लावलेली हजेरी वैचारीक कार्यक्रमही चांगले होवू शकतात याचे उदाहरण ठरले असून १४ मे रोजी युवाशाहीर स्वप्नीलदादा डुंबरे यांच्या पहाडी आवाजात मलकापूर शहरात पुन्हा एकदा स्वराज्याच्या काळात गेल्याची भावना श्रोत्यांना करून दिली.

एका बाजूला विजांचा कडकडाट व पाऊस सुरू असतांनाही मलकापूर येथील छत्रपती शिवराय मंगल कार्यालयाच्या लॉनमध्ये बसलेले शिवशंभू पाईक मात्र भर पावसातही हटायला तयार नाही.  लॉनमध्ये भरगच्च श्रोते यात सर्व समाजाच्या माता-भगिणी, बालके व वयोवृध्दांचाही सहभाग. पहाडी आवाज असणार्‍या युवा शाहीर स्वप्नीलदादा डुंबरे यांच्या पोवाड्यांनी सर्व मग्न झाले होते. मात्र नाईलाज पोवाडे गायनासाठी लागणारा इन्स्ट्रूमेंट व संच यांनीच हात टेकल्याने सदर कार्यक्रम सभागृहात हलविण्यात आला. तेथेही अर्धातास थांबून शिवशंभूच्या विचारांवर चालणार्‍या पाईकांनी सभागृह भरगच्च भरून  या कार्यक्रमाला लावलेली हजेरी खरोखरच नोंद घेण्यासारखी होती. 

विजाच्या कडकडाटाच्या साक्षीने पहाडी आवाजाचे धनी असलेले युवा शाहीर स्वप्नीलदादा डुंबरे यांनी पोवाडे गात शिवशंभूंच्या स्वराज्याच्या इतिहासाची मांडणी आपल्या दमदार पहाडी आवाजात ऐकवीत श्रोत्यांना मग्न केले. 

मलकापूर शहराच्या इतिहासात प्रथमच पोवाड्यांच्या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन

मलकापूर शहराच्या इतिहासात प्रथमच पोवाड्यांच्या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन शिवशंभू पाईक या बॅनरखाली कोणाचेही नाव न देता सर्व जाती-धर्मातील सुशिक्षीत व सस्कांरीत व अध्यात्मिक क्षेत्रातील नागरिकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राजकारण विरहीत या कार्यक्रमात मंचकावर कुठलाही सत्कार नाही वा कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

विशेष बाब म्हणजे प्रथमच मलकापुरात सर्वच जाती-धर्मातील, सर्वच पक्षातील, संघटनेतील व जनसामान्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावत मलकापुरातील जनता चांगले व वैचारीक कार्यक्रम राबविल्यास त्याला नक्कीच प्रतिसाद देतात, हे दाखवून दिले.

No comments